कतरीनाला चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता ...

कतरीनाला चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता (When Katrina Kaif Was Removed From The Film After Giving A Shot, It Was Thought That Her Career Was Over)

आजच्या काळात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत कतरीना कैफच्या नावाचा समावेश होतो. कतरीनाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, ग्लॅमरस शैलीने आणि सौंदर्याने इंडस्ट्रीत स्थान मिळवले. कतरीनाला ही प्रसिद्धी सहज मिळाली असे नाही, यश मिळवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. अनेक वेळा तिला नकारही सहन करावा लागला होता. एकदा तर तिला एका चित्रपटासाठी सीन शूट केल्यानंतर चित्रपटानंतर काढून टाकले होते.

एका मुलाखतीदरम्यान कतरीनानेच खुलासा केला होता की, ‘साया’ चित्रपटासाठी एक सीन शूट केल्यानंतर मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मला मी चांगली अभिनेत्री नाही, माझे पुढे काहीच होऊ शकत नाही असेही म्हटले. त्यांच्या अशा बोलण्यामुळे मला खूप रडायला आले होते.

कतरीनाने पुढे म्हणाली की, “मला साया नावाच्या चित्रपटातून हाकलण्यात आले. किंवा मला रिप्लेस केले असे सुद्धा म्हणू शकता.  या चित्रपटाची निर्मिती अनुराग बासू यांनी केली होती. त्यात जॉन अब्राहम आणि तारा शर्मा यांनी भूमिका केल्या होत्या. एक सीन केल्यानंतर मला त्यांनी बाहेर काढले. तेव्हा मला माझे आयुष्य संपले , माझे करीअर संपले आहे असे वाटू लागले होते. “

कतरीना कैफने 2003 मध्ये ‘बूम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यानंतर तिने ‘राजनीती’, ‘टायगर जिंदा है’, ‘जब तक है जान’, ‘झिरो’, ‘नमस्ते लंडन’ आणि ‘अजब प्रेम की गजब कहानी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि स्वत:ला सिद्ध केले.

कतरीनाच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती फोनभूत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ चतुर्वेदी आणि इशान खट्टर दिसणार आहे.