कतरीनाने जेव्हा अक्षय कुमारला राखी बांधू का ? अ...

कतरीनाने जेव्हा अक्षय कुमारला राखी बांधू का ? असे विचारले तेव्हा अक्षयची झाली होती अशी अवस्था (When Katrina Kaif asks Akshay Kumar – Can I Tie You a Rakhi? Know What Was Actor’s Reaction)

अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता अक्षय कुमारने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावरील रोमॅण्टिक जोड्यांपैकी एक मानली जाते. मध्यंतरी या दोघांमध्ये काहीतरी आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. पण कतरीनाने तर अक्षयला मी तुला राखी बांधू का ?  असे विचारले. तेव्हा अक्षयने त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली होती.

हा सर्व प्रकार तीस मार खान या चित्रपटाच्या सेटवर घडला होता. कतरीना शीला की जवानी या गाण्याचे शूटिंग करत होती. द कपिल शर्मा शोमध्ये कतरीनाने हा मजेशीर किस्सा सांगितला. कतरीनाने शो मध्ये अक्षयला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली.

कपिलने यामागचे कारण विचारल्यावर तिने सांगितले की, अक्षय माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही कित्येक वर्ष एकमेकांना ओळखतो. तो नेहमीच माझी रक्षा करतो. त्यामुळे मी अक्षयला तुला राखी बांधू का? असे विचारले होते. यावर अक्षयने मी तुला कानाखाली मारु का ? असे म्हटले. त्यानंतर मी अक्षयला राखी बांधून घेण्यासाठी खूप विनंती केली. पण त्याने काही माझे ऐकले नाही असे कतरीनाने सांगितले.

असेच काहीसे अर्जुन कपूरनेही केले होते. कतरीनाने अर्जुन कपूरलासुद्धा राखीसाठी विचारले होते पण त्यानेही नकार दिला. पण कतरीना अक्षयला तिचा मानलेला भाऊच मानते.

कतरीना आणि अक्षयची जोडी प्रेक्षकांना आधीपासूनच खूप आवडायची. असे असूनही त्यांनी मध्यंतरीची १० वर्षे एकमेकांसोबत कामच केले नव्हते. त्यानंतर ते सूर्यवंशी या चित्रपटात एकत्र दिसले. कतरीना आणि अक्षयच्या जोडीने  ‘नमस्ते लंडन’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’, ‘तीस मार खान’, ‘दे दणादण’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपचटात एकत्र काम केले. कतरीनाचे आगामी टायगर ३ आणि फोन भूत हे चित्रपट खूप चर्चेत आहेत.