करिश्मा कपूर आणि रविना टंडनमध्ये या नटासाठी झाल...

करिश्मा कपूर आणि रविना टंडनमध्ये या नटासाठी झाले होते कडाक्याचे भांडण : त्यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या होत्या. (When Karisma Kapoor and Raveena Tandon had Openly Fought for This Actor, They Pulled Each Other’s Hair)

बॉलिवूडमध्ये नट-नट्यांची आपापसातील भांडणे, यात काही नवल राहिलेले नाही. ती अधूनमधून होतच असतात. दोन बायकांचं कधी एकमेकींशी पटत नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे. बॉलिवूडच्या तारका त्याला अपवाद नाहीत. असाच एक प्रसिद्ध झगडा आम्ही तुम्हाला सांगतोय्‌. जो करिश्मा कपूर आणि रविना टंडन या तेव्हाच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये झाला होता. तो देखील एका अभिनेत्याच्या प्रेमात पडल्यामुळे. या अभिनेत्याच्या प्रेमात दोघीही एकाच वेळी पडल्या. अन्‌ त्यावरून सर्वांसमक्ष दोघींचे कडाक्याचे भांडण झाले होते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

एके काळी सलमान – शाहरूख किंवा प्रियंका चोप्रा – करिना कपूर यांच्यात बिनसले होते, तसाच प्रकार करिश्मा कपूर व रविना टंडन यांच्यात घडला होता. त्या दोघी एकमेकींना इतक्या पाण्यात पाहत होत्या की, बोलाचाली सोडा, त्या एकमेकींचं तोंडसुद्धा पाहत नव्हत्या.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

त्यावेळच्या बातम्या ऐकल्या तर रविना व करिश्मा या अजय देवगणवर लट्टू झाल्या होत्या. दोघीही त्याच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. त्या काळात त्या दोघी ‘आतिश’ या  चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्याची नृत्य दिग्दर्शिका फराह खान होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या दोघींच्या झालेल्या भांडणाचा किस्सा फराह खानने एका मुलाखतीत केला होता. करिश्मा आणि रविना यांच्यावर या चित्रपटातील गाण्याचे चित्रिकरण चालू असताना त्या दोघी एकमेकींना भिडल्या, दोघींचं भांडण इतकं वाढलं की, त्या एकमेकींना मारू लागल्या. झिंज्या उपटू लागल्या. त्यांची मारामारी खूपच जोरदार झाली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मिळालेल्या माहितीनुसार या दोघींमध्ये अजय देवगण वरून भांडणाची ठिणगी पडली, अन्‌ त्यांच्यात मारपीट सुरू झाली. सेटवर घडलेला हा प्रकार पाहून उपस्थित कलाकार व तंत्रज्ञ थक्क झाले. या मारामारी नंतर या दोघींनी ‘अंदाज अपना अपना’ मध्ये एकत्र काम केलं खरं, पण त्या दोघी एकमेकींशी बोलत नव्हत्या. ते असो, रविनाच्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर ती अद्यापही चित्रपटात कामे करते आहे. अलिकडेच ती ‘केजीएफ २’ मध्ये दिसली होती. शिवाय ‘घुडचढी’ या चित्रपटाचे ती शूटिंग करते आहे. करिश्मा मात्र सध्या चित्रसृष्टीपासून दूर आहे. पण आपल्या मैत्रिणींसोबत ती काही खास प्रसंगी दिसून येत असते.