रागाच्या भरात करीना कपूरने बिपाशा बसुच्या थोबाड...

रागाच्या भरात करीना कपूरने बिपाशा बसुच्या थोबाडीत मारली होती… काय कारण होतं? (When Kareena Kapoor got Angry and Slapped Bipasha Basu on the Set, Know What Was the Reason)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये मतभेद असणं ही खूप सामान्य बाब आहे. एकाच चित्रपटात काम करणाऱ्या दोन अभिनेत्री पडद्यावर एकमेकांशी कितीही मैत्रीपूर्ण दिसल्या, तरी खऱ्या आयुष्यात त्यांच्यात तितकेच प्रेमळ नाते असेल, असे नाही. या अभिनेत्री पडद्यावर भलेही त्यांचे वैर व्यक्त करत नसतील, पण जेव्हा जेव्हा त्या खऱ्या आयुष्यात समोरासमोर येतात तेव्हा त्यांना एकमेकांशी बोलायलाही आवडत नाही. बॉलिवूडच्या अशाच दोन सुंदर आणि हुशार अभिनेत्रींमधील भांडणाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेत्री बिपाशा बसु आणि करीना कपूर यांच्यात असं काही झालं होतं की त्यामुळे करीनाने सेटवरच बिपाशा बसुच्या थोबाडीत मारली होती.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

त्याचं असं झालं होतं की, ‘अजनबी’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना सेटवर करीना कपूर आणि बिपाशा बसु यांच्यात जबरदस्त भांडण झालं होतं. या चित्रपटामध्ये या दोन अभिनेत्रीं व्यतिरिक्त अक्षयकुमार आणि बॉबी देओल देखील होते. सेटवरील दोघांमधील भांडणाची चर्चा बरेच दिवस सोशल मीडियावर चखळली गेली होती. एका ड्रेसवरून दोघांमध्ये भांडण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार ड्रेसवरून झालेले हे भांडण इतकं वाढलं की रागाच्या भरात करीनाने बिपाशाच्या मुस्काटात लावून दिली होती. एवढंच नाही तर तावातावाने तिने बिपाशाला काळी मांजर असंही म्हटलं होतं.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

या घटनेनंतर एका मुलाखतीत बिपाशाने याबाबत खुलासा करताना म्हटलं होतं की, मला वाटतं की कारण नसताना ही बाब ताणली गेली. तिने असं म्हटलं होतं की, करीनाला डिझायनरचा प्रॉब्लेम होता तर तिने मला यात का खेचलं? हा करीनाचा बालीशपणा आहे, यापुढे मी तिच्यासोबत काम करणार नाही. तर करीनाने देखील एका मुलाखतीमध्ये, मला असं वाटतं की बिपाशाचा स्वतःच्या हुशारीवर विश्वास नाही, असं म्हटलं होतं.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

बंगाली कुटुंबातील बिपाशा बसुचा अजनबी हा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर तिने मोठमोठ्या कलाकारांसोबत अनेक यशस्वी चित्रपट केले. तिच्या खाजगी आयुष्यात अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेले. परंतु सध्या ती अभिनेता करण सिंह सोबतच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. करीनाही तिच्या पती आणि मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे. थोडक्यात दोघींचंही एकमेकांवाचून जराही अडलेलं नाही.