करण जोहरने विमानाच्या टॉयलेटमध्ये केला होता रोम...

करण जोहरने विमानाच्या टॉयलेटमध्ये केला होता रोमान्स करण्याचा प्रयत्न, पण नशिबाने नाही दिली साथ (When Karan Johar Tried to Romance in Toilet of The Plane, But Luck did Not Support And…)

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो, पण सध्या तो ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोसाठी अधिक लोकप्रिय झाला आहे. करण जोहरचा हा शो भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चॅट शोपैकी एक मानला जातो. ज्यामध्ये करण जोहर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असतो आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना आपल्या शोमध्ये कॉफीसाठी आमंत्रित करुन कलाकारांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्येही सांगायला लावतो. या शो मार्फत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.

इतरांकडून गुपिते जाणून घेणाऱ्या करण जोहरनेही स्वतःशी संबंधित एक धक्कादायक खुलासा एका एुपिसोडमध्ये केला. त्याने सांगितले आहे की, फ्लाइट दरम्यान त्याने एकदा विमानाच्या टॉयलेटमध्ये रोमान्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी त्याच्या नशिबाने साथ दिली नाही आणि तो पकडला जाण्यापासून जवळजवळ थोडक्यात बचावला. करण जोहरने नुकतेच आपल्या शोमध्ये स्वतःशी संबंधित हा खुलासा केला आहे.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण 7’ हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. सध्या हा शो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे यात शंका नाही. या शोमध्ये दिसणाऱ्या सेलेब्स चॅट दरम्यान अनेकदा कलाकारांची गुपिते उघडतात. तर कधीकधी करण जोहर आपल्या आयुष्याशी संबंधित मजेदार गोष्टी देखील सांगतो. अलीकडेच, त्याने विमानात रोमान्स करतानाचा त्याचा रंजक किस्सा सांगितला, ज्याबद्दल सर्वजण आश्चर्यचकित झाले.

टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन अलीकडेच ‘कॉफी विथ करण’मध्ये सहभागी झाले होते. करण जोहरने या दोन्ही कलाकारांना अनेक मजेशीर प्रश्न विचारले आणि त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक रहस्येही चाहत्यांसमोर उलगडली. रॅपिड फायर राऊंडदरम्यान करणने टायगरला विचारले की, तू स्वत: मेकआउट केला आहे अशी विचित्र जागा कोणती ?या प्रश्नाचे उत्तर देताना टायगरने हवेत म्हणजेच विमानात असे सांगितले. पुढे तो म्हणाला की, पण ते विचित्र नव्हते तर साहसी होते.

टायगरच्या या स्पष्टीकरणानंतर करण जोहरनेही स्वत:शी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला. करणने आपणही एकदा विमानात सेक्स करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तो म्हणाला की मी एकदा असे करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने माझ्या नशिबाने साथ दिली नाही, कारण मी जवळजवळ पकडला गेलो होतो. पुढे तो म्हणतो की मला समजत नाही की लोक हे कसे करतात?

‘कॉफी विथ करण’ ची सुरुवात 2005 मध्ये झाली होती. या शोचा प्रत्येक सीझन सुपरहिट झाला आहे. सध्या करण जोहर या शोचा सातवा सीझन होस्ट करत आहे. करण जोहर हा बॉलिवूड इंडस्ट्रीचा असा एक चित्रपट निर्माता आहे, ज्याच्याभोवती बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी असते. त्यामुळेच करणचे मन राखण्यासाठी  त्याच्या आमंत्रणाला मान देऊन, सर्व मोठे सेलिब्रिटी त्याच्या पार्टीमध्ये किंवा त्याच्या शोमध्ये उपस्थिती लावतात.