नशेत धुंद होऊन कपिल शर्मा गेला अमिताभ बच्चनला भ...

नशेत धुंद होऊन कपिल शर्मा गेला अमिताभ बच्चनला भेटायला, करीअरच्या पडत्या काळात झाला होता दारूच्या अधीन (When Kapil Sharma Got Drunk and Came to Meet Amitabh Bachchan, He Was Addicted to Alcohol in Bad Phase of Career)

‘द कपिल शर्मा शो’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा त्याच्या ‘झ्वीगाटो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कपिल सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानिमित्त तो वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या करीअरच्या वाईट काळाबद्दल बोलताना एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. अभिनेत्याने सांगितले की, एक वेळ अशी होती की चिंता आणि नैराश्यामुळे त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले होते. एकदा दारूच्या नशेत तो अमिताभ बच्चन यांना भेटायला पोहोचला होता.

कपिल शर्मा इंडिया टीव्हीच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये पाहुणा म्हणून गेला होता, तिथे त्याने आपल्या करीअरच्या वाईट काळाबद्दल सांगितले.

कपिलने सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा मी सर्वच गोष्टी खूप कमी पडत होतो, लोक माझ्या विनोदांवर हसत नव्हते. करीअरच्या या वाईट काळात मी नैराश्याला बळी ठरलो. हे सर्व टाळण्यासाठी मी दारू पिण्यास सुरुवात केली होती. या कारणामुळे त्यावेळी अजय देवगणनेही एकदा शूट रद्द केले होते.

त्या काळात बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनाही समजले होते की कपिल सध्या खूप बिकट परिस्थितीतून जात आहे, पण त्यासाठी माझी कोणाबद्दल तक्रार नव्हती, असेही त्याने सांगितले. तो म्हणाला की माझ्या कारकिर्दीच्या त्या वाईट टप्प्यात काहीच ठीक होत नव्हते, त्यामुळे मला दारूचे व्यसन लागले होते.

पुढे तो म्हणाला, जेव्हा ‘फिरंगी’ चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा बिग बी त्या चित्रपटासाठी व्हॉईस ओव्हर करत होते. डबिंग सुरू असलेल्या स्टुडिओत मी पत्नी गिन्नीसोबत गेलो होतो. त्यावेळी सकाळचे 8 वाजले होते आणि मी आधीच दोन पेग प्यायले होते.

‘फिरंगी’ चित्रपटाचा व्हॉईस ओव्हर संपल्यानंतर अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटासाठी डबिंग करत होते. अशा नशेच्या अवस्थेत कपिलने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला आत सोडण्यास नकार दिला, तरीही तो बिग बींना भेटण्यावर ठाम राहिला. अखेर बिग बींनी त्याला भेटण्यासाठी आत बोलावले.

कपिलने पुढे सांगितले की, बिग बींना भेटल्यानंतर लगेचच त्याने पत्नी गिन्नीची सून म्हणून ओळख करून दिली. तसेच त्यांच्या पाया पडून आभार मानले. बिग बींना भेटल्यानंतर कपिल तिथून निघून गेल्यावर त्यांनी अमिताभ बच्चन यांना मेसेज केला आणि नशेत भेटल्याबद्दल त्यांची माफी मागितली. त्यावेळी कपिलला उत्तर देताना अमिताभ म्हणाले होते – जीवन एक संघर्ष आहे, जीवन हे आव्हानांचे दुसरे नाव आहे.

शाहरुख खानचा किस्सा सांगताना कपिल म्हणाला की, किंग खान माझ्या करीअरच्या वाईट काळात एकदा मला भेटायला आला होता. त्यावेळी शाहरुख खानने मला या टप्प्यातून बाहेर काढण्यासाठी खूप मदत केली होती. याशिवाय अक्षय कुमारनेही मला वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली.

अॅप्लाज एंटरटेनमेंट निर्मित ‘झ्वीगाटो’ चित्रपट 17 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे, या चित्रपटातून कपिल शर्मा तब्बल 6 वर्षांनी चित्रपटांमध्ये परतत आहे. या चित्रपटात कपिलसोबत शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.