गरीबीला कंटाळून गायक कैलाश खेर, जीव द्यायला निघ...

गरीबीला कंटाळून गायक कैलाश खेर, जीव द्यायला निघाले होते… (When Kailash Kher Was About To Commit Suicide Due To Poverty…)

संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध सुफी गायक कैलाश खेर आज ऐषारामी जीवन जगत असले तरी, एके काळी गरीबीला कंटाळून हे गृहस्थ जीव द्यायला निघाले होते. उत्तर प्रदेशातील मेरठ हे त्यांचे जन्मस्थान. आज त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

केलाश खेर यांनी सुरुवातीला संगीताचे धडे आपल्या वडिलांकडून घेतले होते. त्यांचे वडील, मेहर सिंह खेर पुजारी होते. ते घरोघरी आयोजित करण्यात येणाऱ्या छोटेखानी कार्यक्रमात लोकसंगीत गात असत. त्यांना संगीताची आवड होती. पण ते हिंदी सिनेमाची गाणी ऐकत नसत. संगीत हे कमाईचे साधन नसावे, अशी त्यांची विचारसरणी होती. अन्‌ कैलाशने देखील तशीच इच्छा बाळगावी असे त्यांना वाटे. पण कैलाशचे विचार वडिलांपेक्षा वेगळे होते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या कैलाशने वयाच्या १३व्या वर्षी घर सोडले. संगीताचे शिक्षण घेण्यासाठी वडिलांच्या इच्छेविरुद्ध कैलाशने घर सोडले होते. अन्‌ तो दिल्लीस पोहोचला. इथे संगीताचे शिक्षण सुरू केले. पण जगण्यासाठी लहानसहान कामे करायला सुरुवात केली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कैलाशने एक छोटा बिझनेस उघडला. पण नशीबाची साथ मिळाली नाही. तो बिझनेस ठप्प झाला. त्यावर लावलेले पैसे बुडाले. कैलाशला हा धक्का सहन झाला नाही. तो नैराश्याच्या गर्तेत गेला. अन्‌ जीव द्यायला निघाला. पण त्याला जवळच्या व्यक्तीने धीर दिला. अन्‌ हिंमत दिली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आर्थिक व मानसिक हानीतून सावरण्यासाठी कैलाश सिंगापूर आणि थायलंडला गेला. ६ महिने तिकडे राहिल्यावर भारतात परतून तो हृषिकेश येथे पोहोचला. तिथे साधूसंतांच्या सहवासात भजने गाऊ लागला. ती सगळ्यांना आवडायची.

आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कैलाशने मुंबई गाठली. इथे त्याला भारी स्ट्रगल करावा लागला. गोड गळा असला तरी काम मिळणं अवघड झालं होतं. गरीबीत दिवस काढावे लागले. रात्रंदिवस तो स्टुडिओत घिरट्या घालत राहिला.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अखेरीस एक काम मिळाले. राम संपत यांनी त्यांना जिंगल गाण्याचे काम दिले. त्यासाठी ५ हजार रुपये मानधन मिळालं. नंतर दुसरंही काम मिळालं. ‘अंदाज’ चित्रपटात मोठी संधी मिळाली. ‘रब्बा इश्क न होवे’ हे गाणं त्यामध्ये त्यांनी गायलं. ते खूप गाजलं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मात्र जेव्हा कैलाशनी ‘वैसा भी होता है’ या चित्रपटासाठी ‘अल्लाह के बंदे’ हे गाणं गायलं, तेव्हा त्यांची ओळख सिनेसृष्टीला पटली. आतापावेतो कैलाश खेर यांनी ३०० पेक्षा अधिक बॉलिवूडची गाणी गायली आहेत. १८ भाषांमध्ये ते गायले आहेत.