जया बच्चनने, अमिताभ समक्ष रेखाच्या थोबाडीत का म...

जया बच्चनने, अमिताभ समक्ष रेखाच्या थोबाडीत का मारली? (When Jaya Bachchan Slapped Rekha In Front Of Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं प्रेमप्रकरण एका जमान्यात चवीचवीने चघळलं जात होतं, तेव्हाची ही गोष्ट आहे. या दोघांच्या प्रेमाबद्दल आजही कयास लावले जातात. रेखाने खुलेआम, आपले अमिताभवर असलेले प्रेम उघड केले होते. पण अमिताभने धूर्तपणे कधी या प्रेमाचा स्वीकार केला नव्हता. मात्र हे प्रकरण अमिताभच्या घरापर्यंत पोहचलं. अन्‌ कोणी कल्पना देखील केली नसेल, ते घडलं. जया बच्चनने अमिताभच्या समक्ष रेखाच्या थोबाडीत मारली… तिनं आपला राग असा का बरं दाखवला?

अमिताभ – रेखाची प्रेमकहाणी अशी सुरू झाली

‘दो अंजाने’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. रेखाच्या मैत्रिणीच्या बंगल्यावर हे दोघे लपूनछपून भेटत असत. बरेच दिवस हे गुपित राहिलं. मात्र ‘गंगा की सौंगध’ या चित्रपटाचे शुटिंग चालू असताना दोघांची ही भानगड उघडकीस आली. त्या चित्रपटातील एक कलाकार रेखाशी जर जास्तच सलगी दाखवू लागला. अमिताभला ते सहन झालं नाही, अन्‌ त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. सेटवरील लोकांना अमिताभच्या रागाचा अंदाज आला. अन्‌ तिथून या दोघांच्या प्रेमाची चर्चा बहरात आली. दोघेही या प्रेमाचा इन्कार करत राहिले. पण मिडियामध्ये त्यांच्या प्रेमकथा रंगात आल्या. अमिताभ – रेखाने चोरूनलपून लग्न केल्याच्या बातम्या देखील प्रकाशात आल्या.

रेखाच्या सिंदूरने संबंध उघड झाले का?

ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या लग्नात रेखा भांगेत सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घालून हजर राहिली. अन्‌ अमिताभ – रेखाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा फारच वाढली. ऋषी – नीतूच्या लग्नात रेखाचा नवा अवतार पाहून उपस्थित सगळे अचंबित झाले होते. तिथे अमिताभ व जया बच्चन देखील होते. रेखा, अमिताभशी बोलू लागली. थोडा वेळ जया शांत होती. पण दोघांच्या गप्पा संपल्याच नाहीत, तेव्हा जयाला ते सहन झालं नाही व ती मान झुकवून रडू लागली. हा प्रकार पाहून रेखा लग्नमंडपातून निघून गेली. या घटनेनंतर जयाने, रेखाला अमिताभच्या गैरहजेरीत, घरी जेवायला बोलावलं. अन्‌ काय वाट्टेल ते झालं तरी मी नवऱ्याला सोडणार नाही, असं तिला बजावलं.

जयाने अमिताभ समक्ष रेखाला थोबाडीत का मारली?

अमिताभ – रेखाने एकत्र काम करू नये, असं जयाला वाटत होतं. पत्नीच्या नात्याने जयाने या दोघांची जवळीक बरीच सहन केली. रेखाने त्याच्यासोबत काम करू नये, यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. निर्माता टिटो टोनी रेखा व अमिताभला घेऊन ‘राम बलराम’ हा चित्रपट करायला निघाले होते. जयाची टिटोशी चांगली ओळख होती. म्हणून तिने रेखाच्या जागी झीनत अमानला घे, म्हणून टिटोला सांगितले. जयाचं ऐकून टिटोने, रेखाला सिनेमातून काढलं. रेखाला हे कळलं, तेव्हा तिने दिग्दर्शक विजय आनंदला, या चित्रपटात काम करण्याची दृढ इच्छा व्यक्त केली. तेव्हा निर्माता टिटोशी विजय आनंदने सल्लामसलत केली आणि रेखाला अशी अट घातली की, तिनं नाही म्हणावं. पण रेखाला अमिताभचा सहवास हवा असल्याने तिने टिटोला सांगितलं की, मी एकही पैसा न घेता काम करीन. पैसे वाचतात म्हणून टिटोने रेखाला या सिनेमात घेतलं, अन्‌ शुटिंग सुरू झालं. रेखा ‘राम बलराम’ मध्ये फुकटात काम करतेय्‌, हे जयाला कळलं तेव्हा तिला सहन झालं नाही. एके दिवशी अमिताभला न सांगता, जया या सिनेमाच्या शुटिंग स्थळी पोहचली. तिथे अमिताभ – रेखा यांना खासगीत बोलताना जयाने पाहिलं आणि तिचा तोल सुटला. जयाने सर्वांसमक्ष रेखाच्या थोबाडीत ठेवून दिली. हे सगळं इतकं अचानक घडलं की, अमिताभ काही करू शकला नाही. तो सेटवरून चुपचाप घरी निघून गेला.

रेखा व जया पूर्वी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी रेखा मुंबईला आली, तेव्हा तिची पहिली मैत्रिण जया भादुरी होती.

‘सिलसिला’ हा रेखा – अमिताभचा शेवटचा चित्रपट

रेखा आणि अमिताभ रिलेशनशिपमध्ये होते, अशी कबुली निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांनी एका मुलाखतीत दिली होती. ‘सिलसिला’ची निर्मिती चालू असताना मी नेहमी टेन्शनमध्ये असायचो, असंही त्यांनी सांगितलं. रेखा, अमिताभची गर्लफ्रेंड होती, अन्‌ जया पत्नी. तिथे काहीही घडू शकलं असतं. मात्र या चित्रपटाचं शुटिंग संपल्यावर रेखा – अमिताभचे संबंध हळूहळू कमी झाले. रेखा, अमिताभशी लग्न करू पाहत होती. अन्‌ दुसरेपणाची बायको म्हणून राहायला तयार होती. पण अमिताभ आपल्या बायकोला सोडायला तयार नसल्याचं पाहून रेखाच्या लक्षात आलं की आपले संबंध पुढे जाऊ शकत नाहीत. अन्‌ ते दोघे एकमेकांपासून दुरावले.