जेव्हा जन्नत जुबेरने मालिकेत इंटीमेट सीन्स करण्...

जेव्हा जन्नत जुबेरने मालिकेत इंटीमेट सीन्स करण्यासाठी दिला नकार त्यावेळी निर्मात्यांनी तिला हूल दिली (When Jannat Zubair Refused to Kiss Her Co-Star, Makers of ‘Tu Aashiqui’ Were Forced to Take Such Step)

टीव्ही इंडस्ट्रीतील तरुण अभिनेत्री जन्नत जुबेर सध्या खतरों के खिलाडी या शोमध्ये दिसत आहे. जन्नतने खूप कमी वयात लोकप्रियता मिळवली आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दमदार अभिनय करुन तिने प्रेक्षकांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले. मालिकांमध्ये लव्ह ट्रॅक सुरु असल्यास काही वेळेस त्यात इंटीमेट सीन्स दाखवले जातात. असे सीन्स करताना अनेक अभिनेत्री थोड्या कचरतात मात्र जन्नतला आता असे सीन्स करावे लागणार नाहीत.

याबाबतचा एक किस्सा समोर आला आहे. तू आशिकी या मालिकेदरम्यान जन्नतने आपला सहकलाकार ह्रत्विक अरोराचे ऑनस्क्रीन चुंबन घेण्यास नकार दिला होता. तिच्या या नकारामुळे तिचे निर्मात्यांसोबत थोडे मतभेद झाले. प्रकरण इथपर्यंत वाढले की निर्मात्यांनी जन्नतच्या जागी नवी अभिनेत्री आणण्याची तयारी सुरु केली.

प्रेक्षकांचे मालिकेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांना मालिकेत चुंबनाचे दृश्य दाखवायचे होते. पण ते करण्यासाठी जन्नत आणि तिच्या आईने नकार दिला होता.कारण त्यावेळी जन्नत फक्त १६ वर्षांची होती. त्यामुळे जन्नतच्या आईने मालिकेच्या निर्मात्यांना त्या सीनसाठी स्पष्टपणे नकार दिला.

जन्नतच्या आईने एका मुलाखतीत सांगितले की, मी त्या सीन्ससाठी नकार दिल्यावर जन्नतच्या जागी दुसरी अभिनेत्री आणण्याची तयारी सुरु झाली होती. पण नंतर मी निर्मात्यांशी चर्चा करुन आम्हाला हवा तसा तो सीन शूट करुन घेतला. मालिकेच्या त्या स्पेशल एपिसोडला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे निर्मात्यांनी सुद्धा जन्नतलाच मालिकेत ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगामुळे जन्नतला भविष्यात इंटीमेट सीन न करण्याची सूट मिळाली.

जन्नतने एका मुलाखतीत सांगितले की, माझ्या वयानुसार हात आणि कपाळाच्या चुंबन दृश्यांसाठी माझी काहीच हरकत नव्हती मात्र इंटीमेट सीन्स करण्यासाठी मला अवघडल्यासारखे वाटत होते. पण जेव्हा इंटीमेट सीन्स न करण्याची परवानगी निर्मात्यांकडून मिळाली तेव्हा मात्र मला खूप आनंद झाला होता. 

जन्नतने पुढे सांगितले की, जेव्हा मी माझ्या मालिकेतील भूमिकेसाठी वेगळ्या अभिनेत्रींच्या ऑडीशन सुरु आहेत हे ऐकले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला होता. मी केलेल्या कष्टाचा काय फायदा झाला असे विचार माझ्या मनात आले. पण जे प्रेक्षक मला वर्षानुवर्षे टीव्हीवर पाहत आहेत त्यांना मी इंटीमेट सीन करताना पाहून धक्का बसेल असेही वाटले.

जन्नतच्या करीअरबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या २० वर्षांची असून तिने ‘काशी- अब न रहे तेरा कागज़ कोरा’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘माटी की बन्नो’,‘फुलवा’ आणि ‘मेरी आवाज़ ही पहचान है’ या मालिकांमध्ये काम केले.