दुनियादारीतील शिरीन हा रोल माझा होता मग तो सईला...

दुनियादारीतील शिरीन हा रोल माझा होता मग तो सईला का देण्यात आला?.. या अभिनेत्रीने विचारला दिग्दर्शकाला जाब (‘when i was supposed to play main role in ‘duniyadari’, how sai tamhankar came into picture’:actress attack the director of film)

दुनियादारी या चित्रपटाला 9 वर्षे पूर्ण होऊनही त्याची जादू अजून्ही कमी झालेली नाही. आताही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तेवढीच पसंती मिळते. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना जवळची वाटतात. पण आता 9 वर्षांनी या चित्रपटासंबधी नवा वाद समोर आला आहे.

सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने उपस्थिती लावली होती. त्यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. या पॉडकास्टमध्ये तेजस्विनी दुनियादारी चित्रपटातील शिरीन ही भूमिका आधी तिला मिळाल्याचा दावा केला. तेजस्विनी म्हणाली की, ‘दुनियादारी चित्रपटातील शिरीनची भूमिका माझी होती. जर ती भूमिका मी साकारली असती तर आज मी कदाचित वेगळ्या ठिकाणी असते.

संजय जाधव हे जर आज हा पॉडकास्ट ऐकत असतील तर त्यांनी मला सांगावं की काय झालं तेव्हा की माझं कास्टिंग काढून तुम्ही सईला चित्रपटात घेतलं. 16 डिसेंबरला माझं लग्न होतं. 20 तारखेला फिल्म ऑनफ्लोर जाणार होती. संजय सरांनी सांगितलं की, मेहंदी काढायची नाही. मी मेहंदी पण नाही काढली.

त्यानंतर 8 डिसेंबरला माझ्या वडिलांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली की, दुनियादारी चित्रपट येणार आहे. त्यात कास्टिंगबाबत देखील लिहिण्यात आलं होतं. यामध्ये माझं नाव नव्हतं. मी सगळ्यांना फोन केले होते. पण तेव्हा मला कोणी निट उत्तरं दिली नाहीत.’

तेजस्विनीबद्दल बोलायचे झाल्यास काही महिन्यांपूर्वीच तिची रानबाजार ही वेब सिरीज प्रदर्शित झाली होती. याशिवाय मी सिंधूताई सकपाळ या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर तिने देवा, तू हि रे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.