ऋतिक रोशनने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होत...

ऋतिक रोशनने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, कारण वाचून व्हाल थक्क (When Hritik Roshan Had Decided to Leave the Film industry, You Will be Surprised to Know Reason)

‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा अभिनेता हृतिक रोशन हा इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. अमिषा पटेलसोबत आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या हृतिक रोशनने एकापेक्षा एक अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. पण हृतिकच्या आयुष्यात एक असाही काळ आला होता जेव्हा त्याला ही चित्रपटसृष्टी सोडून जायची इच्छा झाली होती.

इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर यशस्वी चित्रपटाने आपल्या फिल्मी करीअरची सुरुवात केल्यानंतरही त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्याच्या हाताला एक अतिरिक्त अंगठा असल्यामुळे तर लहानपणी तोतरेपणामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.

2000 मध्ये हृतिकचे वडील राकेश रोशन यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. वडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर हृतिकने अचानक अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याने खूप विचार करून नंतर निर्णय बदलला.

 वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत हृतिक  अडखळत बोलायचा. त्यामुळे शाळेत खिल्ली उडवली जात होती. पण त्याने हार मानली नाही आणि आपले बोलणे सुधारले.

हृतिक रोशनचा जन्म मुंबईत झाला. त्याचे कुटुंब पूर्वीपासूनच फिल्म इंडस्ट्रीशी जोडले गेले होते. अभिनेत्याचे वडील राकेश रोशन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत, तर हृतिकचे काका देखील इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार आहेत.

सध्या हृतिक आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप चर्चेत आहे. हा अभिनेता गेल्या काही काळापासून सबा आझादला डेट करत आहे. अलीकडेच हृतिक सबा आझादसोबत राहण्यासाठी नवीन घरात शिफ्ट होत असल्याचे बोलले जात होते. सबासोबतच्या नात्यामुळे हृतिक रोशनला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते.

अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे तर, 48 वर्षीय हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी ‘फायटर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण दिसणार आहे. दीपिका आणि हृतिक या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

हृतिकचे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि अव्वल अभिनेत्यांपैकी एक असल्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या फॉलोअर्सची संख्या ४४.५ मिलियन इतकी आहे.