शाहरुख खानचं सह-अभिनेत्रीसोबतचं प्रेमप्रकरण ऐकू...

शाहरुख खानचं सह-अभिनेत्रीसोबतचं प्रेमप्रकरण ऐकून त्रस्त झाली होती गौरी खान, तेव्हा रागात आलेल्या किंग खानने घेतला होता हा निर्णय…. (When Gauri Khan Was Upset After Hearing The News of Shahrukh’s Affair With Co-Actress, King Khan took This Step in Anger)

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान काल ५६ वर्षांचा झाला. १९९२ सालात ‘दिवाना’ या चित्रपटापासून त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक सरस चित्रपट केले. दरम्यान त्याने असेही काही चित्रपट केले होते की ज्यांची आठवणही तो पुसून टाकू इच्छितो. त्याच्या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा, ज्यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं होतं, तो आपण जाणून घेऊया. शाहरुख खानचे त्याच्या सह अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची खबर कानावर पडताच गौरी बरीच त्रस्त झाली होती, त्यावेळेस रागात आलेल्या शाहरूखने जे पाऊल उचलले होते त्यामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले होते.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘माया मेमसाब’ या चित्रपटामुळे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची या चित्रपटातील नायिका दीपा साही दोघांनाही फारच वाईट टीकेस सामोरं जावं लागलं होतं. शाहरुखचा पहिला चित्रपट ‘दीवाना’ सुपरहिट ठरला होता, पंरतु ‘माया मेमसाब’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. मात्र या चित्रपटातील दीपा साही आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित करण्यात आलेला एक बोल्ड सीन फारच चर्चिला गेला होता. अन्‌ तशातच एका पत्रकाराने नियतकालिकामध्ये शाहरुख आणि दीपा साही यांच्या प्रेमप्रकरणाची बातमी छापली, ज्यामुळे शाहरुखच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं होतं.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

नियतकालिकामधील शाहरूख आणि दीपा यांच्यातील प्रेमप्रकरणाची बातमी वाचून गौरी खान खूपच वैतागली होती, एवढेच नाही तर, शाहरुखशी लग्न करून तिने चूक तर नाही केली ना, असाही विचार ती करू लागली होती. तर दुसरीकडे खोट्या बातमीमुळे त्रस्त झालेल्या गौरीला पाहून शाहरुखचाही रागाचा पारा चढला आणि रागाच्या भरात अशाप्रकारे खोटी बातमी देणाऱ्या पत्रकाराला मारण्यासाठी तो गेला होता, तेही सासऱ्यांनी दिलेली तलवार घेऊन….!

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

एका मुलाखतीत शाहरुखने स्वतःच, तो पत्रकारासोबत कसे चुकीचे वागला होता हे सांगितले होते. ह्या घटनेनंतर खरोखरच दुसऱ्या दिवशी त्याच्या सेटवर पोलीस आले आणि त्यांनी शाहरुखला गजाआड केले होते. खरं तर मेमसाब चित्रपटातील त्या बोल्ड सीनने ही सर्व आग लावली होती अन्‌ त्यात पत्रकाराने शाहरुख आणि दीपा यांच्यात प्रेम शिजतंय असं छापून आगीचा भडकाच उडवला. ९० च्या दशकातील हा चित्रपट केतन मेहताने दिग्दर्शित केला होता.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सदर चित्रपट बराच चर्चेत राहिल्याने तसेच चांगलाच आपटल्याने शाहरुख काही आता या चित्रसृष्टीत टिकत नाही, अशाप्रकारचे अंदाज लावले जाऊ लागले होते. परंतु, शाहरुखने सगळ्यांना खोटे ठरवले. पुढे त्याने ‘बाजीगर’ आणि ‘डर’ सारख्या चित्रपटांत नकारात्मक भूमिका साकारूनही दर्शकांची वाहवा मिळवली. तेव्हापासून आजपर्यंत त्याने आपलं बॉलिवूडमधील किंगचं स्थान अबाधित ठेवलं आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘पठाण’ आणि ‘लायन’ या चित्रपटांचे शूटिंग करत होता, परंतु क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणात लेक आर्यन खानला अटक झाल्यानंतर निर्मात्यांनीच शूटिंग काही काळ स्थगित केले होते. जामीन मिळाल्यानंतर आर्यन खान मायदेशी परतला असला तरी सध्या तरी शाहरुखला त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे असे दिसते. तो शेवटचा 3 वर्षांपूर्वी ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.