शाहरुख आणि गौरी या कारणाने एकमेकांपासून वेगळे ह...

शाहरुख आणि गौरी या कारणाने एकमेकांपासून वेगळे होणार होते (When Gauri Broke The Relationship Because Of This Act Of Shahrukh)

बॉलिवूडच्या कपल्सबद्दल बोलायचे झाल्यास त्यात अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान ही जोडी टॉपच्या स्थानावर असते. दोघे अनेकदा कपल कसे असावे याची उदाहरणे त्यांच्या चाहत्यांना देत असतात. पण त्यांच्या आयुष्यात एक क्षण असा होता, जेव्हा त्यांची जोडी एकमेकांपासून वेगळी होणार होती.

शाहरुख आणि गौरी एकमेकांसाठी कसे अनुरुप आहेत हे त्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे. पण काळानुसार दोन व्यक्तींमधील प्रेम कमी होत जाते असे म्हणतात. गौरी खानने एका मुलाखतीत त्यांच्या नात्यासंबंधी एक किस्सा सांगितला. ज्यामध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

गौरीने सांगितले की, शाहरुख तिच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह होता. पण ही गोष्ट मात्र गौरीला खूप त्रासदायक वाटायची. तिला तिचा वेळ हवा होता. त्यासाठी ती शाहरुखपासून दूर होत गेली. पण त्यांचे नाते इतके घट्ट होते की ते पुढे पुन्हा एकत्र आले.

शाहरुख आणि गौरीला लग्न करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. शाहरुख मुस्लिम आणि गौरी हिंदू असल्यामुळे त्यांच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला नकार होता. गौरीच्या घरच्यांना पटवण्यासाठी शाहरुखने खूप कष्ट घेतले. पुढे त्यांच्या घरच्यांनाही त्यांच्या प्रेमाची ताकद समजली आणि त्यांनी दोघांचे लग्न लावून दिले. शाहरुख आणि गौरीने दोन वेळा लग्न केले आहे.

गौरी खानची ओळख ही केवळ शाहरुखची पत्नीच नसून ती एक चित्रपट निर्माती, इंटेरियर डिझाइनर आणि कॉस्च्युम डिझायनरही आहे. गौरी रेड चिलीज एंटरटेन्टमेंट या कंपनीची सहसंस्थापक आहे. २००४ मध्ये तिने मै हू ना हा पहिला चित्रपट बनवला होता. त्यानंतर इंटेरियर डिझाइनर म्हणून तिने २०१२ मध्ये सुरुवात केली.