यामी गौतमीचा व्हिडिओ जेव्हा एका चाहत्याने गपचूप...

यामी गौतमीचा व्हिडिओ जेव्हा एका चाहत्याने गपचूप बनवला तेव्हा गोपनियतेवरुन अभिनेत्रीने म्हटली ही गोष्ट(When Fan Made Video of Yami Gautami without Her Permission, Actress Said This About Privacy)

बॉलिवूड कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जायला तयार असतात. त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी काहीजण जीवाचा आकांत करतात. फोटो आणि व्हिडिओसाठी चाहते अनेकदा त्यांच्या मर्यादा ओलांडतात. चाहत्यांच्या अशा कृत्यांमुळे कधीकधी कलाकारांनाही त्रास होतो. दरम्यान, अलीकडेच बॉलिवूड एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या अशाच एका घटनेचा उल्लेख केला आणि सांगितले की एकदा तिच्या चाहत्याने परवानगीशिवाय तिचा व्हिडिओ बनवला होता.

यामी गौतम एक सुंदर आणि हुशार अभिनेत्री आहे. तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले असून आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. चाहत्यांमध्येही तिची प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एका चाहत्याने तिच्या परवानगीशिवाय तिचा व्हिडिओ बनवला होता. यासोबतच तिने प्रायव्हर्सीबाबतही मत मांडले आहे.

चाहत्याच्या या कृत्याने यामी गौतम खूपच नाराज झाली होती.  या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना तिने सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या वागणुकीबाबत मर्यादा आणण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की, एकदा एक मुलगा तिच्या शेतात आला होता, तो 19-20 वर्षांचा असावा. त्याने माझ्या स्टाफला विनंती केली की त्याला यामी गौतमला भेटायचे आहे.

चाहत्याने सांगितले की त्याला माझ्यासोबत सेल्फी काढायचा होता, परंतु त्याने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली, ज्याची मला अजिबात माहिती नव्हती. अभिनेत्रीने सांगितले की तिच्या चाहत्याने तिच्या नकळत तिचा व्हिडिओ शूट केला आणि नंतर तो व्लॉगवर देखील शेअर केला, ज्यासाठी त्याला लाखो व्ह्यूज मिळाले.

यामी पुढे म्हणाली की, जेव्हा अशा व्हिडीओवर कमेंट येतात तेव्हा लोकांना वाटते की मला त्या कमेंट मिळाल्या, अशा प्रकारच्या गैरवर्तनामुळे इतरांनाही असेच काहीतरी करावेसे वाटते, पण प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. गोपनीयतेबाबत सीमा आखणे आवश्यक आहे, कारण हा प्रकार योग्य नाही.

अभिनेत्री अलीकडेच ‘लॉस्ट’ या चित्रपटात दिसली होती. याशिवाय लवकरच ती अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत ‘ओह माय गॉड 2’, ‘चोर निकल के भागे’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.