चुंबन दृश्ये देऊन इमरान हाशमी घरी बायकोचा मार ख...

चुंबन दृश्ये देऊन इमरान हाशमी घरी बायकोचा मार खात असे; प्रत्येक चुंबनामागे तिला गिफ्ट द्यावी लागे (When Emraan Hashmi’s Wife Used To Hit Him for every kissing scene: Actor Used to Gift a Bag for Every Kiss)

रुपेरी पडद्यावर चुंबनसम्राट म्हणून ख्याती पावलेला इमरान हाशमी अभिनयात धिटाई दाखवत असला तरी घरी मात्र गरीब गाय होत असे. कारण या गोष्टींवर राग व्यक्त करीत त्याची बायको त्याला खरपूस मार देत असे.
पडद्यावरची चुंबने बायकोला आवडत नसत

‘मर्डर’ या चित्रपटात अतिशय बोल्ड असं चुंबन दृश्य सादर करून इमरान हाशमीने खळबळ माजवली होती. त्यानंतर प्रत्येक चित्रपटात तो किसींग सीन देऊ लागला व बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याची ही चुंबने भलेही प्रेक्षकांना आवडत होती, पण त्याची बायको परवीन ही दृश्ये पाहून भयंकर चिडत होती.
आधी बायको बॅगने मारायची, आता हाताने मारते

एका मुलाखतीत खुद्द इमरान हाशमीने हा गौप्यस्पोट केलेला आहे. त्यानं म्हटलं आहे की, ‘सिरीयल किसर’ या टॅगवर तो बिल्कुल खुश नाही. अन्‌ माझ्या बायकोला तर ही चुंबाचुंबी अजिबात आवडत नाही. त्याला पडद्यावर चुंबन घेताना पाहून तिचा संताप होत असे. इतकी की बॅग घेऊन ती इमरानला बॅगने मारायची. या मुलाखतीमध्ये चेष्टेच्या स्वरात तो म्हणाला होता, ”आता ती पूर्वीइतकी जोराने मारत नाही. आधी बॅगेने मारायची, आता हाताने मारते. मात्र पूर्वीपेक्षा ती आता बरीच शांत झाली आहे.”


‘मर्डर’ पाहून तिने इमरानला नखांनी ओरबाडले…

२०१४ साली ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात इमरानने एक किस्सा सांगितला होता. ‘मर्डर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अन्‌ तो बायको परवीनला घेऊन सिनेमा पाहयला गेला. सिनेमातील गरमागरम दृश्ये पाहून ती इतकी भडकली की, तिने नखांनी इमरानच्या हाताला ओरबाडले. सिनेमा संपला तेव्हा इमरानच्या हातावर नखांचे व्रण पडले होते. अर्थात्‌ हा किस्सा इमरानने हसत हसत सांगितला होता.
बायकोला पटविण्यासाठी प्रत्येक चुंबनामागे गिफ्ट द्यावी लागे…

चित्रपटात इमरानला चुंबन दृश्ये तर द्यावी लागत असत. कारण त्याची ख्यातीच तशी झाली होती. अन्‌ बायकोचा राग तर अनावर होत असे. म्हणून तिला पटविण्यासाठी त्यानं शक्कल लढवली. हा किस्सा खुद्द इमराननेच जाहीर केला होता. त्याने सांगितले, ”परवीनला बॅगांचा खूप शौक आहे. त्यामुळे प्रत्येक किसींग सीनच्या मोबदल्यात मी तिला बॅग विकत घेऊन द्यायचो. तिचे कपाट बॅगांनी भरले आहे.”
खऱ्या जीवनात इमरान हाशमी एक कौटुबिंक माणूस आहे

पडद्यावर अतिशय बोल्ड सीन देणारा इमरान हाशमी खऱ्या जीवनात मात्र एक कौटुंबिक माणूस आहे. परवीन हाशमीसोबत लग्न होऊन त्यांच्या वैवाहिक जीवनाला १४ वर्षे झाली आहेत व त्यांना एक मुलगा आहे. इमरानचे आपल्या बायको व मुलावर अतिशय प्रेम आहे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायला त्याला आवडते.
लवकरच ‘चेहरे’ मध्ये दिसेल इमरान

अलीकडेच इमराश हाशमीचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये त्याच्या सोबत जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे. आणि लवकरच त्याचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रिया चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूजा, अमिताभ बच्चन आणि अनु कपूर मुख्य भूमिकेत दिसतील.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा