मद्यधुंद संजय दत्त, श्रीदेवीच्या खोलीत घुसला; त...

मद्यधुंद संजय दत्त, श्रीदेवीच्या खोलीत घुसला; त्याच्याबरोबर काम न करण्याची तिनं घेतली शपथ (When Drunk Sanjay Dutt Entered Sridevi’s Room, And Actress Decided Not To Work With Him)

आज संजय दत्तचे फिल्म इंडस्ट्रीत नाव मोठे असले तरी त्याच्या जिंदगीमध्ये वादविवाद पण बरेच झाले आहेत. त्याच्या काही हरकतींनी तो बदनाम झाला आहे. म्हणूनच कदाचित बॉलिवूडचा बॅड बॉय अशी उपाधी त्याच्यामागे लागली असावी. संजय दत्तची अशीच एक वादग्रस्त भानगड श्रीदेवीशी जोडलेली आहे. मद्यधुंद होऊन संजयने तिच्याशी अशी हरकत केली की, पुन्हा त्याच्यासोबत काम न करण्याची तिने शपथ घेतली. ही नेमकी भानगड काय आहे, ते बघूया.

ऐंशीच्या दशकातली ही विवादास्पद घटना आहे. नेमकं सांगायचं तर ती घडली १९८३ मध्ये. संजय दत्तने श्रीदेवीशी असं काही कृत्य केलं की, ती अतिशय घाबरली. हा सर्व तमाशा संजय दत्तच्या व्यसनापायी घडला.
संजय दत्त श्रीदेवीचा जबरदस्त फॅन होता.

श्रीदेवी बॉलिवूडची टॉपची हिरॉईन होती. तिचे चाहते लाखोंनी होते. संजय हा त्यापैकीच एक होता. ‘रॉकी’ चित्रपटाने संजय स्टार झाला होता खरा, पण नशापाणी करण्याच्या व्यसनापासी वाया गेला होता. ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाचे शुटिंग श्रीदेवी मुंबईत करत असल्याची खबर संजयला लागली. त्या दिवशी संजय नशेत चूर होता. अन्‌ त्याला अचानक आपली आवडती अभिनेत्री श्रीदेवीला भेटण्याची उर्मी आली.

नशेत चूर होऊन संजय श्रीदेवीच्या चेंजिंग रुममध्ये घुसला.

काहीही होवो, आज श्रीदेवीची गाठ घ्यायचीच, असे संजयच्या मनाने घेतले अन्‌ नशिल्या अवस्थेत तो तिच्या सेटवर पोहोचला. त्याला ती दिसली नाही, तेव्हा तो तिच्या खोलीत घुसला. श्रीदेवीला असं काही घडेल, अशी कल्पना नसल्याने ती अतिशय घाबरली. तिने सुरक्षा रक्षकांना बोलावलं. त्यांनी संजयला खोलीबाहेर काढलं. नंतर या घटनेबाबत एका मुलाखतीत त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला,” मी तिच्या खोलीत गेलो होतो खरा. पण तिथे मी तिच्याशी काय बोललो, काय वागलो, ते आठवत नाही.”

संजय सोबत कधीही काम न करण्याची श्रीदेवीने शपथ घेतली.

त्यानंतर मात्र श्रीदेवीने निर्णय घेतला की, संजयबरोबर काम करायचे नाही. तेव्हा श्रीदेवी टॉपची नटी असल्याने आपल्या अटी घालू शकत होती. पुढे एक वेळी अशी आली की, संजय देखील मोठा स्टार झाला. त्यामुळे नाइलाजाने का होईना, पण श्रीला त्याच्यासोबत ‘जमीन’ हा चित्रपट करारबद्ध करावा लागला. मात्र त्याच्याशी एकत्रितपणे एकही सीन करणार नाही, या अटीवर श्रीने हा चित्रपट स्वीकारला. पुढे काही कारणांनी हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.

श्रीदेवीने संजयला ‘गुमराह’ मधून काढण्याचा प्रयत्न केला.

नंतर असं घडलं की, श्रीदेवीला संजयसोबत महेश भट्ट यांच्या ‘गुमराह’ मध्ये काम करावं लागलं. असं सांगितलं जातं की, महेश भट्ट या सिनेमाची ऑफर घेऊन श्रीकडे गेले तेव्हा तिनं या चित्रपटातून संजयला काढून टाका, अशी अट घातली. पण महेशनी मानलं नाही. दरम्यानच्या काळात श्रीदेवीचे सिनेसृष्टीतील तेज कमी झालं होतं, अन्‌ संजयच्या यशाचा आलेख चढता होता. तेव्हा श्रीला ‘गुमराह’मध्ये काम करणं भाग पडलं. पण असं कळतं की, सेटवर संजय-श्री एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हते. सीन संपताच श्री त्याच्यापासून दूर निघून जायची.

त्यांचे संबंध कधीच नॉर्मल झाले नाही.

सदर चित्रपट प्रदर्शित झाला व चांगलाच हिट देखील झाला. या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडली. कालपरत्वे दोघांचे संबंध पहिल्यापेक्षा सुधारले. पण कधीच सुरळीत झाले नाहीत. संजयने देखील आपल्या परीने ते सुरळीत होण्याचे कधी प्रयत्न केले नाहीत.