6 महिन्यांसाठी गेली होती दिशा पाटणीची स्मृती (W...

6 महिन्यांसाठी गेली होती दिशा पाटणीची स्मृती (When Disha Patani lost her Memory For 6 Months)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी चित्रपटांपेक्षा आपल्या फिटनेस, अॅक्शन आणि बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. चाहते अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे तिने कधी कोणतीही पोस्ट शेअर केली तर काही तासांतच ती व्हायरल होते. दिशाला बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

दिशा पाटणी जिम्नॅस्टिक्स आणि मार्शल आर्ट्समध्ये खूप हुशार आहे. अनेकदा ती आपले स्टंट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. असेच एकदा स्टंट करताना ती पडली आणि त्याचवेळी तिचे डोके जमिनीवर आपटले होते. त्यामुळे तिची स्मरणशक्ती गेली. एका मुलाखतीत दिशाने सांगितले होते की तिला जवळपास 6 महिने काहीच आठवत नव्हते.

दिशा बॉलिवूडची अॅक्शन क्वीन म्हणून ओळखली जाते. तिला जेव्हा शूटिंग नसते तेव्हा ती मार्शल आर्ट्स आणि जिम्नॅस्टिक्सचा सराव करते. स्टंट करण्यात पूर्णपणे पटाईत आहे.

दिशा पाटणीच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचे तर ती सध्या टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अलीकडेच जेव्हा टायगर श्रॉफ करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये आला होता तेव्हा त्याने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गुपिते उघड केली. त्याचबरोबर सध्या आपण सिंगल असल्याचेही सांगितले. पण दुसरीकडे टायगर श्रॉफची आई दिशाच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करते. तिच्या फोटोंना लाईक्स आणि प्रेमळ कमेंट्स करत असते. त्यामुळे त्यांचे चाहते या दोघांमध्ये काय चालले आहे याबद्दल संभ्रमात आहेत.

दिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती काही महिन्यांपूर्वी एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटात दिसली होती. याशिवाय येत्या काळात दिशा ‘योद्धा’,‘के टीना’,‘प्रोजेक्ट’ आणि ‘सूर्या 4’ या चित्रपटांत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सूर्या 4 साठी दिशाने 4 ते 5 कोटी रुपये फी घेतली आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम