कामाच्या मोबदल्यात, एका दिग्दर्शकाने प्राची देस...

कामाच्या मोबदल्यात, एका दिग्दर्शकाने प्राची देसाईकडे ठेवला शरीरसुखाचा प्रस्ताव : नकार दिला तरी तिची पाठ सोडली नव्हती (When Director Had Made Such a Demand from Prachi Desai, Even After Refusing He Chased Actress)

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखविणारी प्राची देसाई आता इथे चांगलीच जम बसवून आहे. पण टी.व्ही. क्षेत्रातून फिल्मी क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अभिनेत्रींना कास्टींग काऊचचा सामना करावा लागतो.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

असा अशोभनीय प्रसंग प्राची देसाईवर पण गुदरला होता. या संदर्भात तिने स्वतःच किस्सा सांगितला की एका दिग्दर्शकाने कामाच्या मोबदल्यात तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यावर तिने स्पष्ट शब्दात नकार दिला, तरी त्याने तिचा पिच्छा सोडला नव्हता.

प्राचीने या बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, तिने दिग्दर्शकाची मर्जी राखली नाही, म्हणून तिला त्याच्या बड्या चित्रपटात भूमिका मिळाली नाही.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्राचीने पुढे असेही सांगितले की, नकार दिला तरी तो दिग्दर्शक लोचटासारखा तिच्याशी संपर्क साधत राहिला. कामाच्या मोबदल्यात शरीरसंबंध राखण्याची मागणी नाकारली तरी तो पुनःपुन्हा मागणी करतच राहिला.

असल्या अशोभनीय कृत्याला होकार देण्यापेक्षा प्राचीला आपली इभ्रत आणि आत्मसन्मान मोठा वाटला होता, हे यावरून दिसून येतं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्राची देसाईच्या अभिनय कारकीर्दीचा आढावा घ्यायचा झाला तर तिने २००६ साली आलेल्या ‘कसम से’ या मालिकेतून पदार्पण केलं. या मालिकेत ती राम कुमारची नायिका झाली होती. यातून नाव व प्रसिद्धी मिळविल्यानंतर प्राचीने २००८ साली ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, बोल बच्चन, अजहर अशा चित्रपटातून ती चमकली.