डिंपल कपाडियाला आपला जावई अक्षय कुमार वाटला होत...

डिंपल कपाडियाला आपला जावई अक्षय कुमार वाटला होता गे, अभिनेत्याला समजताच त्याने दिली भयानक प्रतिक्रिया (When Dimple Kapadia Mistook Akshay Kumar as Gay, Know What Was Actor’s Reaction)

अक्षय कुमार हा बॉलिवूड इंडस्ट्रीचा सर्वात व्यस्त आणि सर्वाधिक चित्रपट करणारा सुपरस्टार आहे. पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या अक्षय कुमारने आपल्या 31 वर्षांच्या फिल्मी करीअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अक्षय जेवढा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो त्याचप्रमाणे तो आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. अक्षयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर फार कमी लोकांना माहिती असेल की, ट्विंकल खन्नासोबत लग्न होईपर्यंत त्याची सासू डिंपल कपाडिया त्याला ‘गे’ मानत होती.

 अक्षय कुमार जेव्हा ट्विंकल खन्नासोबत लग्न करणार होता, त्यावेळी त्याची सासू डिंपल कपाडिया यांना त्याच्या ‘सेक्स’बद्दल थोडी शंका होती. अक्षय कुमार ‘गे’ असल्याचं डिंपलला वाटायचे. अक्षयला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तो आपल्या सासूवर चांगलाच भडकला. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याची पत्नी ट्विंकल खन्नाने केला आहे.

2016 मध्ये अक्षय कुमार करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये पत्नी ट्विंकल खन्नासोबत गेला होता, त्यावेळी त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यावेळी ट्विंकल खन्नाने सांगितले की, माझी आई डिंपल कपाडियाला अक्षय ‘गे’ वाटायचा, कारण तिच्या एका पत्रकार मित्राने अक्षय गे असल्याचे तिला सांगितले होते. त्यामुळे तिला अक्षयवर संशय होता.

ट्विंकलने सांगितले की, जेव्हा माझ्या आईला हे कळले तेव्हा तिने अक्षयची चौकशी केली. अक्षयला लग्नानंतर मुले होणार की नाही,  ते पाहण्यासाठी त्याची जेनेटिक टेस्टसुद्धा करण्यात आली. त्यावर अक्षय म्हणाला की, जेव्हा मला समजले होते की, माझ्या सासूबाई मला गे समजतात तेव्हा मला त्यांचा खूप राग आला होता.

इतकेच नाही तर डिंपल कपाडियाने आपली मुलगी ट्विंकलचा हात अक्षयला देण्याआधी, लग्नापूर्वी त्यांनी अक्षयला ट्विंकलसोबत एक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहण्याची अट घातली होती. त्यामुळे सासूच्या सल्ल्यानुसार, अक्षय ट्विंकलसोबत जवळपास एक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिला होता. त्यानंतर 2001 मध्ये दोघांनी लग्न केले.