देव आनंदने ‘सत्यम शिवम सुंदरम’ला म्हटले होते डर...

देव आनंदने ‘सत्यम शिवम सुंदरम’ला म्हटले होते डर्टी पिक्चर, झीनत अमान झाली होती कारणीभूत (When Dev Anand called Raj Kapoor’s ‘Satyam Shivam Sundaram’ dirty Picture, Was Upset With Zeenat Aman’s Closeness With Raj Kapoor)

शशी कपूर-झीनत अमान अभिनीत ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जबरदस्त हिट झाला आणि तेवढाच वादातीत ठरला. या चित्रपटामध्ये झीनत अमानचे बरेच बोल्ड सीन होते आणि चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिचे हे फोटो लीक झाले आणि गोंधळ माजला. यामुळे चित्रपट वादग्रस्त झाला. त्यात राज कपूर यांच्या बोलण्याने तेलाचे काम केले. ते म्हणाले, ‘त्यांना झीनतचे शरीर पाहण्यास येऊ द्या. ते बाहेर पडताना माझा चित्रपट स्मरणात ठेवतील.’ झीनत अमानचे न्यूड फोटो पाहिल्यानंतर लोकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली. राज कपूरने या चित्रपटामध्ये झीनतला अतिशय कामुक प्रदर्शित केले होते.

सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाला देव आनंद म्हणाला होता डर्टी पिक्चर

झीनत अमानचा ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हाच देव आनंद यांचा ‘देस परदेस’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देव आनंद यांच्या अस्ताला चाललेल्या करिअरला नवीन दिशा दिली होती, परंतु राज कपूर यांच्या चित्रपटाच्या यशाने देव आनंद नाखुश होते. असा उल्लेख पत्रकार वीर सांघवी यांनी आपल्या ‘ए रुड लाइफ’ या आत्मचरित्रात केला आहे. त्याने लिहिले आहे की, ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाविषयी बोलताना देव आनंद राज कपूरला बोलले की, हा डर्टी पिक्चर आहे. तू पाहिलंस कसा कॅमेरा झीनतच्या शरीरावर फोकस केला गेला आहे?

देव आनंद राज कपूरना मिळालेल्या यशाने नाखूश का होते?

लोक म्हणायचे की देव आनंदला राज कपूर आवडत नाही. तो त्यांच्या यशामुळे त्यांचा राग करतो. परंतु हे खरं नाही. असं म्हणतात की झीनत अमानमुळे तो राज कपूरवर चिडला होता. यामागेही एक मजेशीर किस्सा आहे.

देव आनंदला झीनत आवडू लागली होती

वास्तविक झीनत अमानला देव साहेबांनी शोधलं होतं. १९७१ मध्ये आलेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटा दरम्यान देव साहेबांना आपण झीनतच्या प्रेमात पडत आहोत असे जाणवू लागले होते. देव साहेबांनी त्यांच्या ‘रोमांसिंग विथ लाइफ’ या पुस्तकातही ते कुठेही बसलेले असोत, कोणी झीनतबद्दल बोलले तर त्यांना बरे वाटायचे असे नमूद केले आहे. त्यांना झीनतला आपल्या मनातील भाव सांगायचे होते, पण ते शक्य झाले नाही आणि त्याला कारणाभूत होते राज कपूर साहेब.

देव आनंद झीनतला प्रपोज करू इच्छित होते

देव आनंदने त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, ते हळूहळू झीनतच्या प्रेमात पडले होते. त्यांना त्यांचे प्रेम व्यक्त करायचे होते. झीनतला ताज हॉटेलमध्ये प्रपोज करायचे त्यांनी ठरवले. त्यांनी मनातल्या मनात त्याची तयारीही केली होती. त्या आधी त्या दिवशी त्यांना एका पार्टीला जायचे होते. त्या पार्टीनंतर झीनतला ताज मध्ये घेऊन जाऊन आपल्या मनातील सांगायचे असे देव साहेबांनी ठरवले होते. 

राज कपूर यांनी देव आनंदचा प्लान फ्लॉप केला

परंतु पार्टी दरम्यान ड्रिंक घेतलेल्या राज कपूरने झीनतला पाहता क्षणी आपले बाहू पसरविले. झीनतही लगेच त्यांच्या मिठीत गेली. देव आनंदना हे आवडले नाही. काहीतरी गडबड आहे असे त्यांना वाटले. झीनत राज कपूर च्या ‘सत्यम शिवम् सुन्दरम’ चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट द्यायला गेली होती अशी अफवा ऐकल्याचे देव साहेबांना त्यावेळी पटकन आठवले. अन्‌ ती अफवा नसून खरं होतं याची त्यांना जाणीव झाली. आणि ते नाराज झाले. यामुळेच कदाचित चित्रपट प्रदर्शित झाला, यशस्वी झाला तरी देव साहेबांना ही गोष्ट फारशी रुचली नाही. त्यांना राज कपूरच्या यशाबद्दल मत्सर वाटू लागला, म्हणूनच त्यांनी चित्रपटाला डर्टी पिक्चर असे म्हटले.

या आधीही राज कपूरने झीनतला केले होते किस

हे पहिल्यांदाच झालं नव्हतं. देव साहेबांच्या समोर राज कपूर यांनी अनेकदा झीनतवरील त्यांचं प्रेम निदर्शनास आणून दिलं होतं. इश्क इश्क इश्क या चित्रपटाच्या प्रिमीयरच्या वेळी राज कपूरने सर्वांदेखत झीनतला किस केलं होतं. देव आनंदला तेव्हाही ते खटकलं होतं.