सलमानच्या या कमेंटवर भडकली होती दीपिका पादुकोण ...

सलमानच्या या कमेंटवर भडकली होती दीपिका पादुकोण (When Deepika Padukone was Enraged by This Comment of Salman Khan, Know What Was That)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत आपल्या अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणने इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे, मात्र या अभिनेत्रीने आतापर्यंत सलमान खानसोबत एकही चित्रपट केलेला नाही. दीपिका आणि सलमानमध्ये कोणते वाद आहेत त्यामुळे त्यांनी एकत्र काम केले नाही असे नाही. पण एकदा सलमान खानने अशी काही कमेंट केली जी ऐकल्यानंतर दीपिका पादुकोण चांगलीच भडकली.

 एक काळ असा होता जेव्हा दीपिका पादुकोण डिप्रेशनची शिकार झाली होती. नैराश्याने ग्रस्त असलेल्या दीपिका पादुकोणने मानसिक आरोग्याशी संबंधित विषयावर अनेकदा आवाज उठवला आहे. अशातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने एकदा डिप्रेशनबद्दल असे काही सांगितले की, त्यामुळे दीपिका चांगलीच चिडली.

एकदा सलमान खान म्हणाला होता की, त्याने अनेकांना रडताना आणि नैराश्येत पाहिले आहे, पण स्वत: निराश होणे त्याला परवडणारे नाही. त्यावेळी सलमान म्हणाला होता की, परिस्थिती कशीही असो, तो रडणार नाही आणि दु:खीही होणार नाही, कारण ते स्वभावाच्या विरोधात जाते. सलमानच्या या कमेंटमुळे दीपिका कुठेतरी दुखावली गेली आहे.

यानंतर दीपिका पादुकोणने सलमान खानचे नाव न घेता केवळ निशाणा साधला नाही तर त्याला चोख प्रत्युत्तरही दिले. दीपिका म्हणाली होती की, एका मोठ्या पुरुष कलाकाराने म्हटले आहे की, त्याच्याकडे नैराश्याची शिकार होण्याची परवानगी नाही, जणू ती कोणाचीही निवड आहे. नैराश्य ही कोणाचीही निवड असू शकत नाही आणि त्याचा चैनीशी काहीही संबंध नाही.

डिप्रेशनच्या मुद्द्यावरून दोन्ही कलाकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असली तरी प्रत्यक्षात सलमान खान आणि दीपिका पदुकोण यांच्यात खूप चांगले संबंध आहेत,पण असे असूनही दोघांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. मात्र, सलमान खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपटात एकत्र दिसावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.

सलमान खानने एका मुलाखतीत दीपिका पादुकोणसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात सलमान खान पाहूणा कलाकार म्हणून दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे या चित्रपटात दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहे. दुसरीकडे, सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तो ‘बजरंगी भाईजान 2’ चे शूटिंगही करत आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम