वयाच्या १८ व्या वर्षीच स्तनांची उभारी वाढविण्या...

वयाच्या १८ व्या वर्षीच स्तनांची उभारी वाढविण्याचा सल्ला देणारा महाभाग भेटला : दीपिका पादुकोणचा खळबळजनक खुलासा (When Deepika Padukone Was Asked To Get Breast Implants At 18; Actress’ Shocking Revelation)

सध्या दीपिका पादुकोण तिच्या ‘गेहराइयां’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी या चित्रपटातील दीपिकाच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात दीपिकावर चित्रित केलेल्या बोल्ड सीन्सची बरीच चर्चा आहे. दरम्यान, दीपिकाने एक धाडसी आणि खळबळजनक खुलासा केला आहे. वयाच्या १८व्या वर्षीच स्तनांची उभारी वाढविण्याचा सल्ला देणारा महाभाग तिला भेटला होता असे तिने सांगितले तसेच त्यावर तिची प्रतिक्रिया काय होती हे तिने सांगितले आहे.

वास्तविक, अलीकडेच दीपिकाने एका फिल्म मॅगझिनला मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने खुलासा केला की, तिला तिच्या आयुष्यात लोकांकडून चांगले आणि वाईट दोन्ही सल्ले मिळाले आहेत. या चांगल्या-वाईट सल्ल्यांबाबतही तिने मोकळेपणाने भाष्य केले.

मुलाखतीत दीपिकाने सांगितले की, तिला शाहरुखकडून आयुष्यातील सर्वोत्तम सल्ला मिळाला. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाने सांगितले की, तिला शाहरुखकडूनही खूप काही चांगलं शिकायला मिळालं. दीपिका म्हणाली, ‘शाहरुखने मला नेहमी ज्या कलाकारांसोबत काम करायला तुला आवडतं, त्याच कलाकारांसोबत काम कर असं सांगितलं. तो म्हणाला की, जेव्हा आपण एखादा चित्रपट करत असतो त्यावेळेस आपलं आयुष्यही जगत असतो. त्या आठवणी जपत असतो. अनुभव निर्माण करत असतो.’

वाईट सल्ल्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘मला सर्वात वाईट सल्ला ब्रेस्ट इम्प्लांटसाठी मिळाला होता. तेव्हा मी फक्त १८ वर्षांची होते आणि मला कोणीतरी सांगितले की, मला ब्रेस्ट इम्प्लांट करायला हवे. त्यावेळी मला धक्का बसला होता पण, मी या सल्ल्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आजही मी अनेकवेळा याचा विचार करते, आणि त्याही वयात मी इतकी समजूतदार होते की, मी हा सल्ला गांभीर्याने घेतला नाही याचं मलाच कौतुक वाटतं.

दीपिका आज इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मागणी असलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. नुकताच तिचा गेहराइयां हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याशिवाय ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’ आणि हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे.