दीपिका पादुकोणने संजय लीला भन्साळीसोबत लग्न करण...

दीपिका पादुकोणने संजय लीला भन्साळीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सलमान खानने दिली अशी प्रतिक्रिया (When Deepika Padukone Publicly Expressed Her Desire to Marry Sanjay Leela Bhansali, This was Salman Khan’s Reaction)

2006 मध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या करीअरची सुरुवात करणाऱ्या दीपिका पादुकोणचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेतले जाते. यानंतर अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. सध्या दीपिका ‘पठाण’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. दीपिकाचे नाव अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले असले तरी तिला खरे प्रेम रणवीर सिंगच्या रूपाने मिळाले. मात्र, एकदा दीपिकाने प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याशी लग्न करण्याची तिची इच्छा उघडपणे व्यक्त केली होती तिची अशी इच्छा ऐकून सलमान खानने अतिशय मजेदार प्रतिक्रिया दिली होती.

2018 मध्ये दीपिका पादुकोणने रणवीर सिंहसोबत इटलीच्या लेक कोमोमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफचा खूप आनंद घेत आहेत. ‘पिकू’, ‘गोलियों की रासलीला रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमुळे दीपिकाने इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

दीपिकाने साकारलेल्या प्रत्येक पात्राला तिने प्राण देण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी ती मानसिक आरोग्याबाबतही मोकळेपणाने बोलत असते. दीपिकाने भलेही रणवीर सिंहला आपला जोडीदार बनवले असले तरी लग्नाआधी एकदा दीपिकाने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा सर्वांसमोर व्यक्त केली होती.

ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा दीपिका पादुकोण सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 11’ च्या एका एपिसोडमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. त्यादरम्यान सलमान खानने दीपिकाला रणवीर सिंह, संजय लीला भन्साळी आणि शाहिद कपूर यांची नावे घेऊन विचारले की, यापैकी तुला कोणाशी लग्न करायचे आहे, डेट करायचे आहे आणि कोणाला मारायचे आहे.

सलमानच्या या प्रश्नावर दीपिकाने जाहीरपणे सांगितले की तिला संजय लीला भन्साळीशी लग्न करायचे आहे, रणवीर सिंहला डेट करायचे आहे. तसेच शाहिद कपूरचे लग्न झाले आहे, म्हणून त्याला मारायचे आहे. दीपिकाचे उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण ती लग्नासाठी रणवीर सिंहचे नाव निवडेल असे सर्वांना वाटत होते.

दीपिकाचे उत्तर ऐकल्यानंतर सलमान खाननेही यावेळी आपली प्रतिक्रिया दिली. अभिनेत्रीचे उत्तर ऐकून त्याने लगेचच मजेदार पद्धतीने सांगितले की, हे लग्न टीकणार नाही, हे ऐकून सगळे हसायला लागले. खरंतर दीपिकाने हे उत्तर फक्त गंमत म्हणून दिलं, पण नंतर तिने रणवीर सिंहसोबत लग्न केलें.

प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचे नाव एकेकाळी कोरिओग्राफर वैभवी मर्चंटसोबत जोडले गेले होते. असे म्हटले जाते की दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते, मात्र त्यांनी कधीही जाहीरपणे त्यांचे नाते स्वीकारले नाही, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले.