दीपिका पादुकोणला ऐकावे लागले होते लोकांचे टोमणे...

दीपिका पादुकोणला ऐकावे लागले होते लोकांचे टोमणे, अभिनेत्रीने केला आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा (When Deepika Padukone had to listen to people’s taunts, Actress made many revelations related to her personal life)

‘ओम शांती ओम’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पडद्यावर आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांना वेड लावणारी दीपिका पादुकोण एकेकाळी डिप्रेशनची शिकार झाली होती. दीपिकाने अनेकदा मानसिक आरोग्यावर उघडपणे आपले मत व्यक्त केलं आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने मानसिक तणावाबद्दल शेअर केले आहे.

दीपिका पादुकोण नुकतीच अभिनेत्री आणि ब्रिटीश राजघराण्याची सून, मेघन मार्कलच्या पॉडकास्ट शो ‘डचेस ऑफ ससेक्स’ मध्ये सहभागी झाली होती, तिथे अभिनेत्रीने पुन्हा एकदा मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने आपले मत मांडले. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा मी तणावाशी लढत होती तेव्हा अनेक लोक मला पब्लिसिटी स्टंट म्हणत टोमणे मारायचे. डिप्रेशनबद्दल बोलण्यासाठी पैसे मिळाले आहेत, असेही अनेकांनी म्हटले होते.

2015 मध्ये दीपिका पादुकोण डिप्रेशनची शिकार झाली होती. त्यावेळी तिचे मानसिक आरोग्य खूपच खालावले होते. मात्र, तिने आपली मानसिक समस्या लपवण्याऐवजी त्यावर खुलेपणाने सर्वांसमोर सांगितले. नैराश्येतून बाहेर येण्यासाठी तिने उपचारही केले आणि त्यातून बरी होऊन  ती पूर्वीसारखी सामान्य झाली. नैराश्येसमोर हार न मानता अभिनेत्रीने खंबीरपणे त्याचा सामना केला.

पॉडकास्टमध्ये मेघनशी बोलताना दीपिकाने आपल्या आयुष्याशी संबंधित एकेकाळच्या वेदनादायक क्षणांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. अभिनेत्रीने सांगितले की, मी हे आजारपणाचे ढोंग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करत आहे. इतकंच नाही तर अनेक जण मी डिप्रेशनबद्दल बोलण्यासाठी कुठल्यातरी औषध कंपनीकडून भरपूर पैसे घेते किंवा मी कोणत्या ना कोणत्या औषधाची जाहिरात करत असल्याचे म्हणत होते.

दीपिका पादुकोण एक NGO देखील चालवते, या एनजीओमार्फत ती लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचे काम करते. ही एनजीओ गरजू लोकांना मदत करते. दीपिकाने सांगितले की डिप्रेशनवर मोकळेपणाने बोलण्याचा फायदा झाला आहे. लोक आता मानसिक आजारासारखी गोष्ट आहे हे स्विकारू लागले आहेत.

दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री सध्या अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दीपिका शाहरुख खान आणि जॉन अब्राहम सोबत ‘पठाण’ मध्ये दिसणार आहे, तर दुसरीकडे ती ‘द इंटर्न रिमेक’ प्रोजेक्टचा देखील एक भाग असणार आहे, या चित्रपटात ती साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि  मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.