सूत्रसंचालन करताना आपले क्रिकेटपटू विचित्र नजरे...

सूत्रसंचालन करताना आपले क्रिकेटपटू विचित्र नजरेने टक लावून बघायचे : मंदिरा बेदीने प्रकट केली व्यथा (When Cricketers Used To Stare At Mandira Bedi While Anchoring : The Actress Expresses Her Pain)

आता क्रिकेटचा हंगाम जोरात सुरु आहे. भारत-श्रीलंका कसोटी मालिका रंगतदार अवस्थेत आहे. आत्ताची गाजलेली अभिनेत्री मंदिरा बेदी कोणे एके काळी क्रिकेट सामान्यांचे सूत्रसंचालन करत होती. २००३ साली वर्ल्ड कप स्पर्धेत मंदिरा बेदीने स्पर्धेचे सूत्रसंचालन करून खेळात ग्लॅमर निर्माण केलं होत. लोकांना ते पसंत पडलं होत. पण अलीकडेच मंदिरा बेदीने तेव्हाच्या क्रिकेटपटुंबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

फोटोसौजन्य : इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य : इन्स्टाग्राम
२००३ साली झालेल्या विश्व कप स्पर्धेत भारताचा क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहचला होता. पण कप मिळवू शकला नाही. त्यावेळी मंदिरा बेदी सोनी मॅक्स वाहिनीवर एक्स्ट्रा इनिग्ज या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (अँकरिंग) करायची. मंदिरा त्यावेळेस अगदी तरुण होती व  ग्लॅमरस कपडयात टी.व्ही. वर दिसायची. तिनं अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, हे काम करताना मला वाईट अनुभव आले. ती सांगते की, आपले क्रिकेटवीर माझ्याकडे, विचित्र नजरेने बघायचे.
मंदिराने पुढे असंही सांगितले की, या क्रिकेट स्पर्धेत प्री-मॅच शो चे सूत्रसंचालन करताना काही क्रिकेटवीर माझ्याकडे टक लावून बघायचे. ही पोरगी काय प्रश्न विचारते? कशाला विचारते, असा त्यांचा आविर्भाव असायचा. मला जे उत्तर द्यायचे, ते असंबद्ध असायचे. हा अनुभव माझ्यासाठी फारच भयावह होता. माझा आत्मविश्वास ढळू लागला होता. पण प्रक्षेपणकर्त्यांनी मला धैर्य दिल. २०० महिलांमधून तुझी निवड करण्यात आली आहे. तू बेस्ट आहेस. तू स्वतःवर विश्वास ठेव व पुढे जा, असं सांगून त्यांनी माझी हिंमत वाढवली.

फोटोसौजन्य : इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य : इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य : इन्स्टाग्राम
क्रिकेट सामन्यांचे समालोचन अथवा सूत्रसंचालन या  क्षेत्रात अगदी बोटावर मोजण्याइतक्या महिला आहेत. मंदिरा बेदींचं नाव त्यामध्ये मोठं आहे. तिने २००३ व २००७ साली आयसीसी विश्व कप आणि २००४ व २००६ साली चॅम्पियन्स ट्रॉफीचे सूत्रसंचालन केले होते. त्याचप्रमाणे सोनी मॅक्स वाहिनीच्या इंडियन प्रिमियर लीगच्या सीझन २, या कार्यक्रमाचे संयोजन तिने केले होते.

फोटोसौजन्य : इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य : इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य : इन्स्टाग्राम