संजीदा शेख विरोधात तिच्या नणंदेने नोंदवली होती ...

संजीदा शेख विरोधात तिच्या नणंदेने नोंदवली होती मारहाणीची तक्रार, अभिनेत्रीने दिले हे उत्तर (When Complaint Lodge against Sanjeeda sheikh by her Sister-in-law, Actress Responded in this way)

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख आणि तिचा पती अभिनेता आमिर अली वेगळे झाले असले तरी एकेकाळी आमिर आणि संजीदा हे टीव्हीवरील सर्वात क्यूट आणि हॉट कपल म्हणून ओळखले जायचे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आमिर अली आणि संजीदा शेख यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु दुर्दैवाने, लग्नाच्या जवळपास 8 वर्षानंतर या जोडप्याने 2020 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांचीही निराशा झाली होती. संजीदा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. असेच एकदा तिच्या नणंदेने तिच्या विरुद्ध मारहाणीची तक्रार केल्यामुळे ती चर्चेत आली होती.

२०१७ मध्ये संजीदा शेखची नणंद जाकेरबानो हिने तिच्या विरोधात पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली होती.त्यामुळे संजीदावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला होता. जकरबानो यांनी आपल्या आरोपात म्हटले होते की, 29 मे 2017 रोजी जेव्हा मी माझ्या वडिलांशी फोनवर बोलत होती, तेव्हा संजीदा, माझा भाऊ आणि आईला मारहाण करत होती. तसेच संजीदाला मला मुंबईत राहू द्यायचे नव्हते.

आपल्या नणंदेने लावलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी संजीदा व तिच्या कुटुंबाने अहमदाबाद कोर्टात धाव घेतली. संजीदाने कोर्टात सांगितले की, ज्या दिवशीच्या मारहाणीच्या गोष्टी केल्या जात आहेत त्यादिवशी मी घरी नव्हती तर मुंबईत शूट करत होती. या प्रकरणातील सुनावणीनंतर न्यायालयाने संजीदाला अंतर्गत दिलासा देत तक्रार फेटाळून लावली.

आमिर अली आणि संजीदा शेख यांच्या प्रेमाबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती, त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले आणि मग एकमेकांच्या प्रेमात पडले. आमिरने ‘नच बलिए 3’च्या सेटवर आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त केले. त्याने गुडघ्यावर बसून संजीदाला प्रपोज केले, पण त्याआधी त्यांनी जवळपास 7 वर्षे आपले नाते सर्वांपासून लपवून ठेवले.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आमिर आणि संजीदाने २ मार्च २०१२ला एकमेकांशी लग्न केले. सुखात चाललेल्या संसारात २०२० मध्ये अनेक खटके उडू लागले त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्याच वेळी या जोडप्याला सरोगसीद्वारे एक मुलगी असल्याचेही समोर आले होते. घटस्फोटानंतर संजीदा शेखला आपल्या मुलीचा ताबा मिळाला.

संजीदा शेखने ‘क्या होगा निम्मो का’ या मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली. याशिवाय तिने ‘बिदाई’, ‘भाग्य लक्ष्मी’, ‘लव्ह का है इंतजार’ सारख्या मालिकांमध्येही काम केले. एवढेच नाही तर अभिनेत्रीने ‘बागबान’ आणि ‘तैश’ सारख्या चित्रपटातही काम केले आहे. आमिरबद्दल बोलायचे तर त्याने ‘एक हसीना थी’, ‘टशन-ए-इश्क’, ‘सरोजिनी’, ‘एफआयआर’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.