टीना दत्ताला इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सहकल...

टीना दत्ताला इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सहकलाकाराने चूकीच्या पद्धतीने केला होता स्पर्श (When Co-Star Started touching Tina Datta Inappropriately During Shooting of Intimate Scene, Actress Expressed her Pain)

‘उतरन’ या टीव्ही मालिकेत इच्छाची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री टीना दत्ता सध्या चर्चेत आहे. टीना दत्ता सध्या ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसत आहे. यासोबतच टीना शालीन भानोतसोबतच्या जवळीकेमुळेही चर्चेत आहे. अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सहकलाकारांवर चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला आहे, त्यात टीना दत्ता देखील आहे. एका मुलाखतीत टीना दत्ताने सांगितले की, एका मालिकेमध्ये एका इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सहकलाकाराने मला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

एकदा मालिकेच्या सेटवर टीना दत्ताने सहकलाकारांकडून होणाऱ्या शोषणाच्या मुद्द्यावर मोकळेपणाने बोलले होते. ‘उतरन’ या मालिकेत इच्छा बनून नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर टीना बराच काळ गायब झाली, त्यानंतर ती एकता कपूरच्या  ‘डायन’मधून पडद्यावर परतली.

टीनाने एकदा आपल्या को-स्टारवर गंभीर आरोप केले होते. मालिकेच्या इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सहकलाकाराने चूकीचा स्पर्श केल्याने टीना खूपच तुटली. अभिनेत्रीने सांगितले की, इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सहकलाकाराने माझ्यासोबत बरेच दिवस चूकीचे वर्तन केले. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे सेटवरील अनेकांना त्याच्याबद्दल आधीच माहिती होते.

माझ्या  सहकलाकाराला अनेक वेळा चेतावणी देण्यात आली होती, तरीही तो त्याला जे करायचे तेच करत राहिला. मला त्याच्या या कृतीने खूप अस्वस्थ वाटत होते. मी मालिकेच्या निर्मात्यांनाही याची माहिती दिली.

जेव्हा त्याच्या सहकलाकाराकडून याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा टीनाने केलेले आरोप ऐकून त्याला धक्काच बसला. तो म्हणाला की माझे टीनासोबत चांगले बाँडिंग आहे आणि मी तिच्यासोबत असे कोणतेही कृत्य केले नाही.

अभिनेत्याने सांगितले होते की टीना माझी चांगली मैत्रीण आहे आणि आमच्या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. यासोबतच अभिनेत्याने असेही सांगितले की, शोमध्ये क्वचितच एखादा इंटिमेट सीन होता, जो मी टीनासोबत शूट केला होता.