टीना दत्ताला मारहाण करायचा तिचा बॉयफ्रेंड, अभिन...

टीना दत्ताला मारहाण करायचा तिचा बॉयफ्रेंड, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा (When Boyfriend Used to Beat Up Tina Dutta, Actress Gives a shocking statement About Her Relationship)

‘उतरन’ फेम सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता सध्या ‘बिग बॉस 16’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. टीना आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टी सतत समोर येत आहेत.

कधी लग्नाच्या अफवा तर कधी बॉयफ्रेंडसोबतचे अपमानास्पद संबंध यामुळे  टीना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. असेच एकदा एका मुलाखतीत टीनाने तिचा बॉयफ्रेंड तिला मारहाण करायचा असा खुलासा केला होता.

‘उतरन’ या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने अभिनेत्री टीना दत्ताने प्रेक्षकांची मने जिंकली होती. एका मुलाखतीदरम्यान टीना दत्ताने आपल्या रिलेशनशिपमध्ये झालेल्या त्रासाबद्दल उघडपणे सांगितले. ती म्हणाली होती की, जेव्हा मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा तो मला मारहाण करायचा.

मी 5 वर्षे अशा रिलेशनशिपमध्ये होती. मला माझे नाते कोणत्याही परिस्थितीत वाचवायचे होते. त्यामुळे बॉयफ्रेंडचा प्रत्येक अत्याचार सहन करून मी गप्प राहिली, पण अनेक प्रयत्न करूनही जेव्हा परिस्थिती सावरली नाही तेव्हा मी हे नाते संपवणेच योग्य मानले.

टीना दत्ताच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून तिच्या बॉयफ्रेंडशी ओळख झाली होती, त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, पण कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडवर मारहाणीचा आरोप केला होता.

अभिनेत्रीने खुलासा केला होता की माझ्या बॉयफ्रेंडने माझा इतका छळ केला होता की मी माझा आत्मविश्वासही गमावला. त्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर आपण पुन्हा प्रेमात पडायचेच नाही असे टीनाने ठरवले. मात्र सध्या बिग बॉसच्या घरात टीना आणि शालीन भनोटमध्ये जवळीक वाढलेली दिसते.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम