गाणं म्हणत असताना आशाताई भोसले यांच्या ड्रायव्ह...

गाणं म्हणत असताना आशाताई भोसले यांच्या ड्रायव्हरने ‘हॉस्पिटलात जायचं का?’ असा प्रश्न विचारला. असं काय घडलं होतं? (When Asha Bhosle Was Practicing The Song, Why Did The Driver Ask To Take Her To The Hospital?)

वयाची ऐंशी पार केली तरी सुप्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांच्या आवाजाची जादू व लोकप्रियता अद्याप कायम आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

याचं उदाहरण द्यायचं झालं तर ‘इंडियन आयडॉल १२’ या गाण्याच्या कार्यक्रमात त्यांनी प्रमुख पाहु्णे म्हणून हजेरी लावली होती, तेव्हा कार्यक्रम खूपच रंगला होता. याच कार्यक्रमात एका स्पर्धकाने ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा’ हे गाणं गायलं, तेव्हा या गाण्याशी निगडीत असलेला एक मजेदार किस्सा आशाताईंनी सांगितला.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

त्या गोष्टीची आठवण काढत आशाताई बोलल्या, ”हे गाणं माझ्यासाठी फार अवघड होतं. आर. डी. बर्मन यांनी ते ऐकवलं. जेव्हा आ हाः हाः हाः हाः असं गाऊन दाखवलं, तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की, मला जमणार नाही. तरी पण ४-५ दिवसांची मुदत मी मागितली.”

आशाताईंनी पुढे सांगितलं की, ”मी या अवघड गाण्याची प्रॅक्टीस करू लागले. एके दिवशी मी मोटारगाडीतून चालली असताना हाः हाः हाः हाः अशी प्रॅक्टीस करू लागले. तेव्हा माझी गाडी हाजी अली जवळ पोहचली. तिथून माझं घर जवळ आहे, अन्‌ हॉस्पिटल देखील. माझा आवाज ऐकून ड्रायव्हरला वाटलं की, माझा श्वास कोंडला आहे, मला दम लागला आहे. म्हणून तो म्हणाला, बाई गाडी हॉस्पिटलाकडे घेऊ का?”

पुढे आशाताईंनी आपली मोठी बहीण लतादीदी मंगेशकर यांची नक्कल करून त्यांची प्रतिक्रिया देखील ऐकवली. ”गाणे रेकॉर्ड होणार होते, तेव्हा मी खूप नर्व्हस होते. तेव्हा लतादीदीने माझी हिम्मत वाढवली. अन्‌ मला बळ दिलं.” – आशाताईंनी सांगितलं.

आता हे गाणं किती लोकप्रिय झालं, ते आपण सारे जण जाणतोच. आजही हे गाणं लोकांच्या स्मरणात आहे.