अनुराग कश्यपला नशेची सवय मोडण्यासाठी जावे लागले...

अनुराग कश्यपला नशेची सवय मोडण्यासाठी जावे लागले होते पुनर्वसन केंद्रात (When Anurag Kashyap Addicted To Alcohol, Director Had To Go To Rehab Center To Get Rid Of it)

अनुराग कश्यप हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा लेखक, अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. त्याला त्याच्या चित्रपटांसाठी 4 फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. त्याचे व्यावसायिक आयुष्य यशाच्या शिखरावर जरी असले तरी वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त राहिले आहे. एक काळ असा होता जेव्हा वैयक्तिक आयुष्यात माजलेल्या गोंधळामुळे अनुरागला दारूचे व्यसन जडले होते. दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांची तब्येत आणि प्रकृती खूप बिघडली होती, यातून सुटका करून घेण्यासाठी त्याला पुनर्वसन केंद्रात जावे लागले होते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपने खुलासा केला की तो तीन वर्षांहून अधिक काळ नैराश्याचा सामना करत होता. त्याचवेळी त्याची मुलगी आलिया कश्यपला पॅनिक अटॅक येऊ लागला. यासोबतच त्याने खुलासा केला की 2019 मध्ये ट्विटर सोडल्यानंतर त्याच्या मुलीला बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. तसेच तिला खूप ट्रोल देखील केले जात होते.

मुलाखतीत अनुराग कश्यपने सांगितले की, मी सुमारे अडीच वर्षे खूप आजारी होतो, आधी माझे दोन्ही कान फाटले, नंतर मला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे मी बराच वेळ डायव्ह बोटीवर होतो. डायव्हिंग करताना माझ्या कानाचे पडदे फाटले होते, त्यामुळे मला फार कमी ऐकू यायचे. कान बरा होईपर्यंत मी बोटीवरच राहिलो. कान बरा झाल्यानंतर महिन्याभरात हृदयविकाराचा झटका आला आणि नंतर दम्याचा झटका आला. अशा प्रकारे एकामागून एक आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.

अनुरागने पुढे सांगितले की, माझ्या मुलीला बलात्काराच्या धमक्या मिळू लागल्यापासून या सर्व गोष्टी सुरू झाल्या. या धमक्यांमुळे, माझ्या चिंतेचे प्रमाण वाढले. मी ऑनलाइन मत व्यक्त करणे बंद केले. या घटनेमुळे मला मद्यपान आणि व्यायाम कमी करण्याचे व्यसन लागले. एकामागून एक तब्येत बिघडवणाऱ्या गोष्टी मी स्वत: करू लागलो.

दारू प्यायल्याने एकामागून एक अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या, त्यानंतर या व्यसनातून मुक्त होण्यासाठी मला पुनर्वसन केंद्रात जावे लागले. पुनर्वसन केंद्रात गेल्यानंतर माझ्या पायाची नस फाटली, त्यामुळे मी सुमारे ४ महिने व्हील चेअरवर होतो, परिणामी मी पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली आणि नंतर मला पुन्हा दम्याचा झटका आला.

सुमारे अडीच वर्षांत माझी प्रकृती अधिकच बिघडत गेली. नंतर मी माझ्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दारूचे व्यसन नियंत्रित केले. हळूहळू माझी प्रकृती सुधारू लागली आणि आता मी पूर्वीपेक्षा बरा झालो आहे.

अनुरागने असेही सांगितले की, सोशल मीडियावरील सर्व प्रकारची नकारात्मकता पाहून मी स्वतःला ट्विटरपासून दूर केले. आई-वडील आणि मुलीला आलेल्या धमक्यांमुळे 2019 मध्ये मी माझे ट्विटर अकाउंट डिलीट केले होते.

अनुराग कश्यपचे पहिले लग्न आरती बजाजशी झाले होते, नंतर त्याने अभिनेत्री कल्की कोचलिनशी लग्न केले होते, परंतु कल्की देखील त्याच्यापासून विभक्त झाली आहे. ‘पांच’ चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करीअरला सुरुवात केली. यानंतर त्याने ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मसान’, ‘क्वीन’, ‘उडता पंजाब’, ‘सांड की आंख’ आणि ‘धूमकेतू’ सारखे अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले.