उरोजांच्या आकारावरुन अनन्या पांडे बरेचदा झाली ट...

उरोजांच्या आकारावरुन अनन्या पांडे बरेचदा झाली टिकेची धनी, लोक म्हणाले -‘अंगाने भर, छाती वाढव’ (When Ananya Pandey Had To Face Criticism For Breast Size: ‘People Advised Me To Put On Weight, Increase Breast Size..)

बॉलिवूडमध्ये टिकायचे असेल तर डोक्यावर कोणाचा तरी वरदहस्त असणे गरजे असते नाहीतर स्ट्रगलशिवाय पर्याय नाही. पण कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रीसाठी त्यांचे स्टारडम मिळवणे तितके सोपे नाही. त्यासाठी त्यांना खूप काही सहन करावे लागते. अनेकदा त्यांना कास्टिंग काउचपासून ते बॉडी शेमिंगपर्यंतचे प्रकार सहन करावे लागतात. याबाबत काही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारांचा खुलासा केला होता. आता अभिनेता चंकी पांडेची लेक अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्यासोबत घडलेला बॉडी शेमिंगचा प्रकार उघड केला आहे. अनन्याने सांगितले, करियरच्या सुरुवातीला तिला ब्रेस्ट इम्प्लांट करण्याचे सल्ले दिले गेले होते.

साधारणपणे लोकांचा समज असतो की, स्टारकिड्ससाठी चित्रपटांमध्ये डेब्यू करणे सोपी गोष्ट आहे. पण तसे नाही! त्यांना सतत ‘वशील्याने इंडस्ट्रीत आलेले’ किंवा ‘नेपोटिझम् प्रॉडक्ट’ म्हणून हिणवले जाते. अभिनेत्री अनन्या पांडे ही तर सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या सतत निशाण्यावर असते. पण त्या ट्रोलर्सना कितपत मनावर घ्यायचे हे अनन्याला चांगलेच समजल्यामुळे ती तिच्या करियरमध्ये पुढे वाटचाल करत आहे. पण काही दिवसांपुर्वी झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये अनन्याने तिच्या मनातले दु:ख बोलून दाखवले.

अनन्याने सांगितले की, करियरच्या सुरुवातीला तिच्यावर बॉडी आणि फिगरमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या टिका सहन कराव्या लागल्या. काही दिवसांपूर्वीच अनन्या ‘द रणवीर शो’ मध्ये गेलेली. तिथे करियरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताना तिने म्हटले की, करियरच्या सुरुवातीच्या काळात तिला सेक्सीजम सहन करावे लागले होते. त्यावेळी तिला बुब जॉब करण्याचा सल्ला दिला होता जो ती आजपर्यंत विसरलेली नाही. पुढे अनन्याने सांगितले की तिला लोकांनी फेस आणि बॉडी जॉब करण्याचा सुद्धा सल्ला दिला. तिला ब्रेस्ट इम्प्लांट करण्यास सांगितले. माझ्यासाठी ते खरंच खूप त्रासदायक होतं. मुख्य म्हणजे हे सर्व माझ्या करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होत होते. लोक मला तोंडावर काही बोलायचे नाही पण ते मलाच बोलत आहेत हे मला कळत होतं. लोक मला सहज बोलून जायचे की थोडी अंगाने भर, वजन वाढव. पण मला त्याचे खूप वाईट वाटायचे. लोक एखाद्याला त्यांच्या शरीरावरुन जज् करतात ही माझ्यामते खूप वाईट गोष्ट आहे.

सध्या अनन्या ही इंडस्ट्रीतील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी खूप कमी वेळेत इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान पक्के केले. अनन्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. पण तिथे तिला बरेचदा ट्रोल केले जाते. तिचा ड्रेसिंग सेन्स आणि लुक्सवरुन युजर्स तिला ट्रोल करत असतात.

अनन्याच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या ‘खो गए हम कहां’आणि ‘लायगर’या येऊ घातलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.