अमिताभ बच्चन यांना कर्ज फेडण्यासाठी करावी लागली...

अमिताभ बच्चन यांना कर्ज फेडण्यासाठी करावी लागली होती दिवस रात्र मेहनत (When Amitabh Bachchan Worked Hard Day and Night to Repay Loan, Used to Work in Two Shifts)

मेगास्टार अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षीही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता जेव्हा तेअगदीच कर्जबाजारी झाले होते. त्यांच्याकडे कामही नव्हते. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चनयांना खूप कष्ट करावे लागले होते, कर्ज फेडण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली होती.

एवढेच नाही तर त्या काळात त्यांनी दोन शिफ्टमध्ये सतत कामही केले. बॉलिवूडच्या शहेनशाहने आपल्या कारकिर्दीत जवळपास सर्वच दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. सुनील दर्शन हे त्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनी ‘एक रिश्ता: द बॉन्ड ऑफ लव्ह’ या चित्रपटात काम केले होते.सुनील दर्शनने एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे केले.

त्यांनी सांगितले होते की, अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांच्या डोक्यावर करोडोंचे कर्ज होते. त्यादरम्यान अमिताभ यांना चित्रपटांमध्ये परतायचे होते आणि त्यासाठी ते खूप प्रयत्नही करत होते. त्यावेळी ते यशराजजींसोबत कामाबद्दल बोलले तेव्हा त्यांना ‘मोहब्बतें’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी चित्रपट निर्माता करण जोहरनेही त्यांना ‘कभी खुशी कभी गम या चित्रपटाची ऑफर दिली.

या दोन चित्रपटांशिवाय त्यांच्याकडे ‘एक रिश्ता: द बॉन्ड ऑफ लव्ह’ देखील होता.सुनील दर्शने यांनी सांगितले चित्रपटाचे शूटिंग एका वर्षात पूर्ण करायचे होते, पण आम्हाला जुही चावला गरोदर असल्याचं कळल्यावर धक्का बसला. ही गोष्ट अमितजींना कळल्यावर त्यांनी सुनील दर्शनला सांगितले की, मी इथेच आहे, तुम्ही कामसुरु करा.त्यांनी पुढे सांगितले की, अमिताभ बच्चन त्यांच्या कामाबद्दल खूप शिस्तप्रिय आहेत. तसेच ते आपल्या कामाप्रती प्रामाणिक असून वक्तशीरही आहे. ज्यावेळी अमितजी हा चित्रपट करत होते, त्यावेळी ते ५८ वर्षांचे होते.

त्यादरम्यान ते ‘कभी खुशी कभी गम’साठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि ‘एक रिश्ता: द बॉन्ड ऑफ लव्ह’साठी संध्याकाळी 7 ते पहाटे 2 या वेळेत शूटिंग करायचे.1999 मध्ये अमिताभ बच्चन यांची कंपनी ABCL ला खूप फटका बसला होता, त्यामुळे बिग बी. दिवाळखोर झाले होते. कंपनीच्या तोट्यामुळे अमिताभ यांच्यावर 90 कोटींहून अधिक कर्ज झाले होते.ते कर्ज फेडण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी रात्रंदिवस मेहनत केली. डबल शिफ्टमध्ये काम केले. यासह त्यांनी पुन्हा एकदा इंडस्ट्रीत दमदार कमबॅक केले.