जेव्हा आलिया भट्टला ऊप्स मोमेंटमुळे खजिल होण्या...

जेव्हा आलिया भट्टला ऊप्स मोमेंटमुळे खजिल होण्याची वेळ आली होती…(When Alia Bhatt Had To Regret For ‘Oops’ Moment)

अनेक बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कार्यक्रम किंवा इव्हेंट्सना फॅन्सी कपडे घालून पोहचतात. पण अनेकादा अशा फॅन्सी कपड्यांमुळे त्यांना उप्स मुमेंटची शिकार व्हावी लागते. आता पर्यंत उप्स मुमेंटची शिकार झालेल्या अनेक अभिनेत्रींचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यातच अभिनेत्री आलिया भट्टचा सुद्धा समावेश होता. पण खरेतर आलिया वरुण धवनमुळे त्या क्षणाची बळी पडली होती.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवनने अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. दोघांनीही त्यांच्या करीअरची सुरुवात करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमधून केली होती. त्यानंतर दोघांच्याही करीअरची गाडी अगदी सुसाट सुटली. पुढे २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातसुद्धा त्यांनी एकत्र काम केले.

या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी वरुणने आलियासोबत असे काही केले ज्यामुळे तिला सर्वांसमोर शरमेने मान खाली घालावी लागली. त्यावेळी वरुणने आलियाला उचलून घेतले. तेव्हा तिने पारदर्शक सलवार घातला होता. त्यामुळे त्या पारदर्शक कपड्यांमधून तिची अंतरवस्त्रे स्पष्ट दिसत होती. आलियाचा तो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. अनेकांनी तिला या फोटोवरुन ट्रोलही केले.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास या आधी तिचे  ‘गंगूबाई काठियावाड़ी’ आणि आरआरआर हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता येत्या ५ ऑगस्टला तिचा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर डार्लिंग्स हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे डार्लिंग्स हा चित्रपट तिच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिलाच चित्रपट आहे. या व्यतिरिक्त ती मल्टी स्टारर चित्रपट जी ले जरा मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेती कतरीना कैफ आणि प्रियंका चोप्रा दिसणार आहेत. तसेच ती रणवीर सिंह सोबत  ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या ७ व्या सीजनमध्येही आलेली. तसेच काहीं दिवसांपूर्वीच ती तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग संपवून मायदेशी परतली आहे.

आलियाच्या वैयक्तिक आयुष्याबदद्ल बोलायचे झाल्यास तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत 14 एप्रिलला लग्न केले. त्यानंतर दोन महि्न्यांनी तिने सोशल मीडियावरुन ती गरोदर असल्याची बातमी दिली होती. आलिया तिच्या गरोदरपणाच्या काळातही मोठया उत्साहात काम करत आहे.