अजय देवगणला कोणा दुसरीच्या प्रेमात पडलेलं पाहून...

अजय देवगणला कोणा दुसरीच्या प्रेमात पडलेलं पाहून काजोलनं उचललं होतं हे पाऊल (When Ajay Devgan Fell In Love With Someone Else, Kajol Took This Step)

अजय देवगन आणि काजोल यांची जोडी बॉलिवूडमधील मजबूत जोड्यांपैकी एक असून त्यांच्यातील नातं अतूट आहे. अनेक वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं होतं. दोघांचं कौटुंबिक जीवन सुखासमाधानात चाललं आहे, परंतु एक वेळ अशी आली होती की, यांचं लग्न मोडतंय की काय असं वाटलं होतं.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

एका वार्तेनुसार अजय देवगनचं बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत सूत जुळू लागलं होतं, जे काजोलच्या देखील लक्षात आलं होतं. काजोलला याबद्दल समजताच तिला राग अनावर झाला. काजोलचा कोप इतका वाढला होता की तिने, अजयला मुलांसह घर सोडण्याची धमकीच दिली.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

अजयच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटानंतरच त्यांच्यातील नात्यात कटुता आली होती. त्यावेळेस अजय देवगनचे कंगना रणौतसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या वार्ता ऐकण्यात येत होत्या. काजोलला याबद्दल माहीत पडल्याबरोबर तिने अजयला कंगनापासून दूर राहण्याचं फर्मानच सुनावून टाकलं होतं.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार कंगना आणि अजय यांच्यातील जवळीक बरीच वाढू लागली होती. दोघं एकमेकांसोबत बराच काळ घालवू लागले होते. दोघांमधील ही जवळीकता प्रसारमाध्यमांतून बरीच चर्चिलीही जाऊ लागली होती. अर्थात यात किती खरेपणा आहे, हे आपण सांगू शकत नाही. पण असं म्हणतात की, काजोलच्या रुद्रावताचा परिणाम होऊन, अजय आणि कंगना एकमेकांपासून दूर झाले.