ऐश्वर्या रायने व्यक्त केली बॉलिवूडकरांवरची नारा...

ऐश्वर्या रायने व्यक्त केली बॉलिवूडकरांवरची नाराजी, म्हणाली इथे सगळे मतलबी आहेत (When Aishwarya Rai said- ‘There Are All Crabs Here’, She Reacted Like This Over the Attitude of Bollywood Industry)

आपल्या निळ्याशार डोळ्यांनी मंत्रमुग्ध करणारी सुंदर अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन स्वत:ला वादांपासून दूर ठेवणे पसंत करते. मात्र असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती इंडस्ट्रीबद्दल आपले मत व्यक्त करायला मागे पुढे पाहत नाही.  ऐश्वर्या रायचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेतले जाते. पण इतर नायिकांप्रमाणे तिलाही आपल्या करीअरच्या सुरुवातीच्या काळात खूप अडचणींचा सामना करावा लागला होता.

एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी ऐश्वर्या राय बच्चन दोन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहे. एकदा तिने एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीच्या काळ्या बाजूंबद्दल आपले मत व्यक्त केले. अभिनेत्री म्हणाली होती की, इंडस्ट्रीत असे अनेक खेकडे आहेत जे तुम्हाला खाली खेचण्याचे काम करतात.

एकदा ऐश्वर्या राय बच्चन सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. तिथे तिने बॉलिवूडच्या सर्वात वाईट बाजूंबद्दल सांगितले. या चॅट शोमध्ये अभिनेत्रीने इंडस्ट्रीत बदल घडवून आणण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत तर काही लोकांची मानसिकता वाईट आहे, जी त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी खाली खेचते असे सांगितले.

अभिनेत्रीने सिमी गरेवालला सांगितले होते की, हे फक्त या इंडस्ट्रीपुरतेच खरे आहे की नाही हे मला माहीत नाही, पण जेव्हा मी वाईट मानसिकतेबद्दल बोलते तेव्हा मला असे वाटते की इथे सगळे खेकडे आहेत, कारण जर कोणी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी, इतर खेकडे त्याला खाली खेचतात. खाली खेचल्यानंतर ते म्हणतात तू कुठेही जात नाहीस… आमच्यासोबत राहा… ही वाईट वृत्ती आहे.

इंडस्ट्रीत मी सामान्य नवोदित नसल्यामुळे मला याचा धक्का बसला नाही, असेही ऐश्वर्या म्हणाली होती.  प्रत्येकजण इंडस्ट्रीतील माझे भविष्य ठरवू शकेल यासाठी माझा तो पहिला चित्रपट नव्हता. त्यामुळे मी सुरक्षित होते. चित्रपट फ्लॉप झाल्यावरही मला असुरक्षित वाटत नाही. यासाठी मी संपूर्ण इंडस्ट्रीचे आभार मानते.

ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच ‘पोनियान सेल्वन 1’ मध्ये दिसली होती. लवकरच ती या चित्रपटाच्या सीक्वलमध्येही देखील दिसणार आहे.