सगळ्या ऑफर आलियाच्या कुशीत जातात असे म्हणत ऐश्व...

सगळ्या ऑफर आलियाच्या कुशीत जातात असे म्हणत ऐश्वर्या रायने करण जोहराला मारला टोमणा (When Aishwarya Rai Said- Offers Reach Alia’s Lap, Taunted Karan Johar)

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याने स्वतःला सिद्ध केले आहे. जरी ती स्टार किड असली तरी हा टॅग तिने आपल्या टॅलेंटने पुसून टाकला आहे. अनेकदा ट्रोलर्सने तिच्यावर नेपो किड असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर ऐश्वर्या राय बच्चननेही आलियाबद्दल असंच काहीसं म्हटलं होतं, ज्याची खूप चर्चा झाली होती.

आलिया भट्टने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून करीअरला सुरुवात केली होती. करण जोहर आलियासाठी तिच्या वडिलांप्रमाणे आहे. आलियाने स्वतः अनेकदा सांगितले आहे की, ती करणकडून केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक मत किंवा सल्ले घेते. यावरून ती करणच्या किती जवळची आहे हे स्पष्ट होते.

 2018 मध्ये एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या रायने सांगितले होते की, ‘आलिया खूप पुढे जाईल. ती तिच्या कामाचा आनंद घेत आहे ही एक चांगली गोष्ट आहे. मी स्वतः आलियालाही सांगितले होते की, करणने तुला ज्या प्रकारची साथ दिली आहे ती तुझ्यासाठी खूप चांगली आहे. त्याने तुला सुरुवातीपासूनच साथ दिली आहे. सुरुवातीपासूनच अशा प्रकारचा पाठिंबा मिळणे खूप चांगली गोष्ट आहे.”

ऐश्वर्या पुढे म्हणाली की, आलियाला करणचा खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे. चित्रपटाच्या ऑफर अगदी तिच्या कुशीत जाऊन पोहचतात. ऐश्वर्याच्या या विधानावर करण किंवा आलिया भट्ट या दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ऐश्वर्याच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतं की, आलियाच्या करीअरमध्ये केवळ तिच्या टॅलेंटचाच नाही तर करणचाही मोठा हात असल्याचं कुठेतरी तिला वाटतं.

करण आणि आलियाच्या बॉण्डिंगबद्दल बोलायचे झाल्यास, आलियाच्या लग्नात करणने तिचे कन्यादान केले होते. तो तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळतो. एका चॅट शोमध्ये करण म्हणाला होता की, ‘आलिया ही पहिली व्यक्ती आहे जिच्यासोबत मी एखाद्या वडिलांसारखा वागतो. मी तिच्यावर प्रेम करतो आणि संपूर्ण देशाला माहित आहे की ती बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल खूप प्रेम, आदर, कौतुक आहे.त्यामुळेच जेव्हा तिने मला तिची गोड बातमी सांगितली तेव्हा मला पटकन रडायला आले. आणि मला तसा अधिकार आहे. मी तिच्यासाठी तिच्या पालकांप्रमाणेच आहे.