ऐश्वर्या राय आणि एका प्रसिद्ध दिग्दर्शकात रंगला...

ऐश्वर्या राय आणि एका प्रसिद्ध दिग्दर्शकात रंगला कलगी-तुरा (When Aishwarya Rai had Argued With This Famous Director, Know What Was the Matter)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर तिच्या दमदार अभिनयासाठीही ओळखली जाते. अभिनेत्री ऐश्वर्या रायने अनेक यशस्वी चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिची जादू कमी झालेली नाही. बॉलिवूडमध्ये अनेक वाद होत असतात. पण त्यात ऐश्वर्याचे नाव सहसा येत नाही. ती स्वभावाने फारच शांत आहे. पण जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती कोणाचेही ऐकत नाही. एकदा असेच झाले, ऐश्वर्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकावर रागावली आणि त्यांच्यात भांडण जुंपलं. त्यावेळी त्यांच्यात नक्की कोणत्या कारणामुळे भांडण झालं ? चला जाणून घेऊया.

असे म्हणतात की, ऐश्वर्या तिच्याशी चांगले वागणाऱ्यांसोबत जितकी मितभाषी आहे. तितकाच त्यांच्या चुकीच्या गोष्टीचा तिला लगेच राग येतो.  आणि एकदा का तिला राग आला की मग ती कोणाचेही ऐकत नाही. एकदा दिग्दर्शक मणिरत्नम  देखील तिच्या रागाचे बळी ठरले आणि त्यांच्यात भांडण झाले.

असे म्हणतात की, त्या दोघांमध्ये मेकअपवरून वाद झाला होता, त्यानंतर ऐश्वर्या त्यांच्यावर चिडली होती. त्यांचे हे भांडण ‘रावण’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झाले. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. एक सीन शूट करतेवेळी दिग्दर्शकाने ऐश्वर्याला मेकअपशिवाय शूट करण्यास सांगितले, त्यावरुन दोघांमध्ये मतभेद झाले होते.  

जेव्हा मणिरत्नम यांनी ऐश्वर्याला मेकअपशिवाय शूट करण्यास सांगितले तेव्हा तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत हलका मेकअप केला आणि सेटवर पोहोचली. सेटवर ऐश्वर्याला हलक्या मेकअपमध्ये पाहून मणिरत्नमने तिला मेकअपशिवायच शूट होणार असे सांगून तोंड धुण्यास सांगितले.  पण ती आपल्या मुद्द्यावर ठाम राहून तिथेच बसून राहिली. दोघांमधील या भांडणामुळे चित्रपटाचे शूटिंग बरेच दिवस रखडले होते, शेवटी ऐश्वर्यासमोर दिग्दर्शकाला हार पत्करावी लागली होती आणि त्यांनी ऐश्वर्याला हलका मेकअप करायला देऊन शूटिंग पूर्ण केले.

ऐश्वर्याने ‘ईश्वर’ या तमिळ चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण केले. विशेष म्हणजे ऐश्वर्याचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट ‘और प्यार हो गया’ हा मणिरत्नम यांनीच दिग्दर्शित केलेला. ऐश्वर्याने तिच्या करीअरमध्ये मोहब्बतें, गुरु, ढाई अक्षर प्रेम के, हम दिल दे चुके सनम, जोधा अकबर, देवदास आणि ए दिल है मुश्किल  यांसारख्या अनेक हिट चित्रपटांत काम केले.

ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये जगभरातील अनेक सुंदरींना मागे टाकत मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यापूर्वी १९९१ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली होती. लवकरच ती मणिरत्नमच्या पोंनियिन सेलवन या चित्रपटात दिसणार आहे.