ऐश्वर्या रायने केला होता एक दिवसाचा जॉब, पहिल्य...

ऐश्वर्या रायने केला होता एक दिवसाचा जॉब, पहिल्या पगाराला एवढे मिळाले होते पैसे (When Aishwarya Rai did Job for a Day, Got This Much Money as First Salary)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे संपूर्ण जग चाहते आहे. एकापेक्षा एक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ऐश्वर्या रायने आपल्या करीअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.

मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर 1994 मध्ये ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनली. विश्व सुंदरीचा मुकुट पटकावणाऱ्या ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे आजही जग वेडं आहे. ऐश्वर्या आजच्या तारखेला कोटींच्या संपत्तीची मालक असली तरी मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्याने एक दिवस जॉब केला होता.

असे म्हटले जाते की ऐश्वर्या रायने मॉडेलिंगमधून चित्रपटसृष्टीत इंडस्ट्रीत प्रवेश केला. तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्याच्या सुमारे दोन वर्षांपूर्वी एका कंपनीमध्ये एका दिवसासाठी मॉडेलिंगचा जॉब केले होता. त्या मॉडेलिंगच्या बदल्यात ऐश्वर्याला एका दिवसाचा पगार 1500 रुपये मिळाला होता.

विश्व सुंदरीचा मुकुट डोक्यावर घातल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी ऐश्वर्या रायने ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या ऐश्वर्या रायने ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत बॉबी देओलने मुख्य भूमिका साकारली होती.

ऐश्वर्याचा तामिळ चित्रपट ‘जीन्स’ भारतातून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. ऐश्वर्या रायने तमिळ आणि हिंदीसह सुमारे पाच भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऐश्वर्याने काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

ऐश्वर्याचे नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिच्या प्रसिद्धीनुसार ती एका चित्रपटासाठी तगडे मानधन घेते. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या एका चित्रपटासाठी 10 ते 12 करोड रुपये फी घेते. ऐश्वर्या भलेही गेली काही वर्षे चित्रपटांपासून दूर आहे. पण आता ती एका बिग बजेट चित्रपटातून पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

ऐश्वर्या सर्वात शेवटी 2018 मध्ये फन्ने खां या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच दिग्दर्शक  मणि रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेलवन पार्ट वन’या चित्रपटात दिसणार आहे. 500 कोटींचा बजेट असलेला हा चित्रपट येत्या 30 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक पिरियड ड्रामा असून तो 1995 मध्ये आलेल्या कल्कि कृष्णमूर्ति यांच्या ‘पोन्नियिन सेलवन’ या पुस्तकावर आधारित आहे.