राणी मुखर्जीने शाहरुख खानसोबत इंटीमेट सीन दिल्य...

राणी मुखर्जीने शाहरुख खानसोबत इंटीमेट सीन दिल्यामुळे भडकला होता राणीचा पती आदित्य चोप्रा, करण जोहरने केली मध्यस्ती (When Aditya Chopra got Angry After seeing Rani Mukherjee’s Intimate Scene with Shahrukh Khan, Had a Fight with Karan Johar)

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने आपल्या करीअरमध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक असे जबरदस्त चित्रपट केले आहेत. करण जोहरच्या चित्रपटांमध्ये 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी अलविदा ना कहना’चा समावेश आहे. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्यात शूट केलेल्या इंटिमेट सीनमुळे या चित्रपटाबाबत करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्यात भांडण झाले होते. हे दृश्य पाहून आदित्य चोप्रा भडकला आणि त्याचे करण जोहरशी भांडण झाल्याचं म्हटलं जातं.

कभी अलविदा ना कहना मध्ये शाहरुख खान आणि राणी मुखर्जी आपापल्या जोडीदारांना फसवतात. या चित्रपटातील शाहरुख आणि राणीमधील इंटिमेट सीन पाहून आदित्य चोप्रा चांगलाच संतापला होता. त्याला हा इंटिमेट सीन आवडला नाही, त्यामुळे आदित्य आणि करणमध्ये भांडण झाले. याचा खुलासा खुद्द करण जोहरने केला आहे.

अलीकडेच करण जोहरने ‘ऑल अबाऊट मूव्हीज’ पॉडकास्टमध्ये आदित्य चोप्रासोबत झालेल्या भांडणाचा खुलासा केला. चित्रपट निर्मात्याने सांगितले की आदित्यला भीती होती की भारतीय प्रेक्षक कदाचित हा सीन स्वीकारणार नाहीत. करणने सांगितले की मी त्या सिक्वेन्सचे शूटिंग करत होतो तेव्हा आदित्यने मला बोलावले.

आदित्यने मला फोन केला आणि सांगितले की मी गेल्या काही दिवसांपासून याबद्दल विचार करत आहे. राणी मुखर्जी आणि शाहरुखमध्ये बोल्ड सीन नसावा ही गोष्ट त्याच्या मनात वारंवार येत आहे. तो म्हणाला- त्याला वाटते की शाहरुख आणि राणी यांच्यातील इंटिमेट सीन भारतीय प्रेक्षक स्वीकारणार नाहीत, त्यामुळे याचा विचार करून तो सीन दाखवू नये.

करणने पुढे सांगितले की त्याने आदित्यचा मुद्दा नाकारला आणि आपली बाजू ठेवली. करण म्हणाला की, नाही मी हा सीन शूट करणारच. तू रिलेशनशिपमध्ये आहेस आणि तुझ्यामध्ये सेक्स नाही असे कसे होऊ शकते? करणने हे कबूल केले होते, जेव्हा त्याने याबद्दल विचार केला तेव्हा त्याला कळले की आदित्य त्याच्या जागी योग्य आहे. व्यावसायिकदृष्ट्या आदित्य अगदी बरोबर होता.

2016 मध्ये करण जोहरने म्हटले होते की, जर तो टाईममशीनने जाऊन कोणत्याही एका चित्रपटात बदल करू शकला तर तो ‘कभी अलविदा ना कहना’ असेल., एक चित्रपट निर्माता म्हणून या चित्रपटात झालेल्या चुकांचा पश्चाताप होतो, कारण मी काहीतरी नवीन, मनोरंजक आणि वेगळे चित्रित करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय प्रेक्षकांना आवडला नाही.