अभिनय क्षेत्राला रामराम करायला निघाला होता आमीर...

अभिनय क्षेत्राला रामराम करायला निघाला होता आमीर खान : मग निर्णय बदलला कसा! (When Aamir Khan Was About To Quit Acting : How He Changed The Decision?)

अलिकडेच एका मुलाखतीत आमीर खानने धक्कादायक बातमी दिली की, त्याच्यावर एक वेळ अशी आली की, अभिनय क्षेत्राला तो रामराम करायला निघाला होता. आपले खासगी जीवन व अन्य काही कारणांनी त्याला हे वैराग्य आले होते. पण हा निर्णय बदलला कसा, हेही त्याने पुढे सांगितले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

आमीर खान म्हणाला, “मी खूपच स्वार्थी बनलो आहे. अन्‌ सगळं काही विसरून फक्त कामच करतो आहे, असं माल जाणवलं. माझं कुटुंब आणि मुलांसाठी मी वेळच काढू शकत नव्हतो. म्हणून मग हे ॲक्टिंग करिअर सोडण्याचा मी विचार केला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

तो पुढे म्हणतो,” मला वाटलं की, मी हिरो झालो म्हणजे घरचे लोक मला साथ देत आहेत. मी कामात गर्क झालो. मी सगळ्यांना सहजपणे घेऊ लागलो. पुढे माझ्या लक्षात आलं की, मी गेल्या ३०-३५ वर्षांपासून सतत हेच करतोय्‌. मी स्वार्थी झालोय्‌ अन्‌ फक्त स्वतःचाच विचार करतो, हेही मला उमगलं. मी घरच्या लोकांसोबत होतो खरा, पण जसा असायला पाहिजे, तसा नव्हतो.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मिस्टर परफेक्सनिस्ट पुढे म्हणतो, ”बरं झालं, आता तरी मी भानावर आलो. अजून वेळ गेलेली नाही. आता मी चुका सुधारायला सुरुवात केली आहे.”

आमीरने घेतलेल्या निर्णयावर, त्याच्या मुलांनी सावरले. चुकीचा निर्णय असल्याचे सांगितले. आमीर अखेरीस म्हणाला, ”सिनेमा माझ्या अंगात भिनला आहे. दोन वर्षे सगळं सोडलं अन्‌ पुन्हा परत आलो. ही दोन वर्षे अवघड गेली.” आपण दारू देखील सोडल्याचं आमीरनं सांगितलं.