कामाकडे लक्ष देत नाही म्हणून आमीर खान, ट्विंकल ...

कामाकडे लक्ष देत नाही म्हणून आमीर खान, ट्विंकल खन्नाच्या थोबाडीत मारणार होता… (When Aamir Khan Got Upset With The Act of Twinkle Khanna and About to Slap Her)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारकडे भारंभार चित्रपट असतात, ज्यामुळे तो पूर्णवेळ शूटिंगमध्ये व्यस्त असतो. तर दुसरीकडे त्याची बायको ट्विंकल खन्ना तिच्या फिल्मी करिअरमध्ये फार काही यशस्वी ठरली नाही. परंतु नवरा-बायको म्हणून अक्षय – ट्विंकल ही चाहत्यांची आवडती जोडी आहे. अलिकडेच ट्विंकलने एक किस्सा सांगितला की ज्यामुळे सगळेच अचंबित झाले. तिने सांगितले की, एकदा तिने अशी काही हरकत केली होती की त्यामुळे तिला आमीर खानचा राग ओढावून घ्यावा लागला होता. एवढंच नाही तर रागाच्या भरात आमीर तिला थोबाडीत लगावणार होता.  

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

ट्विंकल खन्नाचं फिल्मी करिअर फ्लॉप ठरलं असलं तरी ट्विंकलनं काही यशस्वी चित्रपटांतूनही काम केलं आहे. परंतु ते चित्रपट यशस्वी होण्याचं श्रेय तिच्या सहकलाकारांना जातं. आठ वर्षं चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर तिनं अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला आणि लेखिका बनली.

फोटो सौजन्य : फाइल

ट्विंकल आणि अक्षय यांची ‘इंटरनेशनल खिलाडी’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान पहिल्यांदा भेट झाली. तेव्हाच ते एकमेकांच्या जवळ आले. असं म्हणतात की अक्षयने ट्विंकलला प्रपोज केल्यानंतर सतत ती त्याच्याच विचारांत असायची. तिच्या याच वागण्यामुळे एकदा आमीर तिच्यावर इतका रागावला होता की तो तिला थोबाडीत मारता मारता राहिला. हा किस्सा स्वत:  ट्विंकलने एका कार्यक्रमात सांगितला होता. त्यावेळी करण जौहरने तिला आमीर खानसोबत तिचं ट्यूनिंग कसं होतं याबाबत प्रश्न विचारला होता.

फोटो सौजन्य: फाइल

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

ट्विंकलनं त्याला उत्तर देताना म्हटलं होतं – ‘आमीरनं मला विचारंल होतं की तू काय करतेस? अशी का वागतेस, तु तुझ्या कामावर का लक्ष देत नाहीयेस?, तेव्हा मी म्हटलं होतं की मी फक्त अक्षयचाच विचार करते आहे. हे ऐकून आमीर रागावला होता आणि मला थोबाडीत मारणार होता.’

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

ट्विंकल ही बॉलिवूडमधील सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिम्पल कपाड़िया यांची मुलगी असल्याने तिने आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनयात करिअर करण्याचा विचार केला. परंतु आठ वर्षे येथे काम केल्यानंतर तिने या क्षेत्रातून बाहेर पडून लिखाण करण्यास सुरुवात केली. येथे तिने खूपच यश मिळवले आहे. आतापर्यंत तिची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ट्विंकलने २००१ साली अक्षयकुमार सोबत लग्न केले आणि लग्नानंतर १ वर्षानी २००२ मध्ये तिने आरवला जन्म दिला, त्यानंतर २०१२ मध्ये तिला नितारा ही मुलगी झाली.