अमीषा पटेलला लग्नाची मागणी घालणाऱ्या व्यक्तीची ...

अमीषा पटेलला लग्नाची मागणी घालणाऱ्या व्यक्तीची तिने बोलती बंद केली (When A Person Proposed Ameesha Patel for Marriage : Know What Was Her Reaction)

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री अमिषा पटेल बरेचदा काहीना काही कारणाने प्रकाशझोतात असते. विशेषतः तिच्या खाजगी जीवनामुळे ती चर्चेत असते. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या अमिषाने पंचेचाळीशी गाठली तरी अजून लग्न केलेले नाही. परंतु अनेकांसोबत तिचे नाव जोडले गेलेले आहे. अलिकडेच बॉयफ्रेंड फैसल पटेलने सोशल मीडियावर तिला लग्नासाठी मागणी घातल्यापासून ती जास्तच चर्चिली जात आहे. परंतु आपल्या उत्तराने तिने चर्चा करणाऱ्यांची बोलती बंद केली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

घोडनवरी अभिनेत्री अमिषा पटेल आतापर्यंत अविवाहित राहून आपण एक आत्मनिर्भर महिला असल्याचे दर्शवित असते. अनेक अभिनेत्यांसोबत तिचे नाव जोडले गेले आहे, परंतु अमिषाने मात्र कधीही याबाबतच्या कोणत्याही गोष्टीचं कधीच समर्थन केलं नाही. तिनं कधीच कोणतं नातं स्वीकारलं नाही.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सांगायचा मुद्दा असा की, काही दिवसांपूर्वी फैसल पटेलने त्याच्या ट्‌विटर हँडलवर जाहिरपणे अमीषाला लग्नाची मागणी घातली होती, ज्यामुळे ती दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचे लोकांना वाटले. या गैरसमजास तेव्हापासून सुरुवात झाली जेव्हा अमीषाने फैसलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शुभेच्छा देताना तिनं ‘हॅपी बर्थ डे माय डार्लिंग, लव यू… तुझं वर्ष चांगलं जावो…’ असं लिहिलं होतं. तर अमिषाच्या या पोस्टला उत्तर देताना फैसलनं लिहिलं होतं – ‘थँक यू अमीषा पटेल, मी तुला पब्लिकली प्रपोज करतोय, तू माझ्याशी लग्न करशील?’

या पोस्टनंतर त्या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याची चर्चा सुरू झाली होती. फैसलच्या या लग्नाच्या मागणीविषयी एका मुलाखतीमध्ये अमीषाने सांगितले होते की, फैसलला ती अनेक वर्षांपासून ओळखते. फैसल आणि त्याची बहीण यांच्याशी तिची चांगली मैत्री आहे. तिने सांगितले की ती पोस्ट म्हणजे गंमत होती. फैसलला अशी मजा मस्करी केलेली आवडते. आणि मी आतापर्यंत अविवाहित आहे कारण मी एकटीच आनंदी आहे, मला कोणत्याही नात्यात अडकायचे नाही, असं स्पष्टपणे सांगत तिने चर्चा करणाऱ्यांची बोलतीच बंद केली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

खरं म्हणजे, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर फैसलला अनेकांचे फोन यायला लागले होते. त्यामुळे त्याने ही पोस्ट काढून टाकली होती. त्यावेळेस ती पोस्ट हटवायची गरज नव्हती, असे अमिषाचे म्हणणे होते.   अमीषा पटेलच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच ‘गदर: एक प्रेम कथा’ च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत सनी देओल या चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त या आधी अमिषाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये यशस्वी भूमिका केलेल्या आहेत.