हाती लोखंडी कांब घेऊन बाईकवाल्यांनी सलमान खानचा...

हाती लोखंडी कांब घेऊन बाईकवाल्यांनी सलमान खानचा वेड्यासारखा केला होता पाठलाग…कशासाठी ते बघा-(When a Group of Bikers Chased Salman Khan With a Rod in His Hands, Know What Was The Whole Matter)

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यामुळे सुरक्षेचा विचार करुन सलमानने त्याच्या कारला बुलेट प्रूफ केले आहे. तसेच स्वसुरक्षेसाठी त्याने बंदूकीचा परवानाही मिळवला आहे. सलमान संबंधीत ९ वर्षांपूर्वीचा एक किस्सा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.९ वर्षांपूर्वी  बाईकवाल्यांच्या एका ग्रुपने हातात कांब घेऊन सलमान खानचा पाठलाग केला होता.

हा किस्सा ९ वर्षांपूर्वी हैदराबाद येथे घडलेला. त्यावेळी २० बाईकवाले सलमानचा पाठलाग करत होते. त्यांनी सलमानचा नुसता पाठलागच केला नाही. तर त्याला पाहण्यासाठी त्याच्या गाडीच्या खिडक्यांना धडकही मारली. बाईकवाल्यांच्या या कृत्यामुळे सलमान चांगलाच भडकला होता. सलमान कडेकोड सुरक्षेत प्रवास करत असतानाही त्या ग्रुपने त्याचा पाठलाग केला होता.

आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जातात. आणि त्यात जर तो कलाकार सलमान खान असेल तर मग चाहत्यांना आवर घालणे अवघड होते. सलमान त्याच्या चाहत्यांचे अति प्रेम लक्षात घेऊन नेहमी आपल्या बॉडीगार्डस् सोबतच फिरतो. २०१३ मध्ये सेलिब्रेटी क्रिकेट लीग पाहण्यासाठी सलमान हैदराबादला गेला होता.

मॅच संपल्यावर सलमान रात्री ११ च्या सुमारास स्टेडियममधून हॉटेलमध्ये जाण्यास निघाला तेव्हा तेथील २० बाईकवाले हातात कांब घेऊन त्याचा पाठलाग करु लागले. खरेतर त्या सर्व बाईकवाल्यांना सलमानची एक झलक पाहायची होती, त्याला समोरासमोर पाहायचे होते. त्यासाठी त्यांनी सलमानच्या कारची खिडकीही ठोठावली. पण त्यांच्या या अशा विचित्र कृत्यामुळे सलमान खान त्यांच्यावर खूप संतापला.

सलमानच्या पुढील कामांबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद येथे सुरु आहे. तसेच तो कतरीनासोबत टायगर ३ मध्ये दिसणार आहे. या शिवाय लवकरच त्याचा नो एन्ट्री में एन्ट्री या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे.