कियाराच्या चाहत्याने आपल्या जीवाशी खेळून घेतली ...

कियाराच्या चाहत्याने आपल्या जीवाशी खेळून घेतली तिची भेट (When a Fan Reached to Meet Kiara Advani, Condition of Actress had Become Something Like This)

बॉलिवूड स्टार्सची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. अनेकदा चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी कित्येक मैल प्रवास करून मुंबई गाठतात. एकदा बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणीसाठी चाहत्याने असाच वेडेपणा केला होता. आपल्या जीवाशी खेळून चाहता कियाराला भेटायला गेला होता.

 एका मुलाखतीत कियारा अडवाणीने चाहत्याशी संबंधित विलक्षण अनुभव शेअर केला. कियाराचा वरुण धवनसोबत जुग जुग जियो हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. याआधी कियाराने ‘कबीर सिंग’, ‘शेरशाह’, ‘भूल-भुलैया 2’ आणि ‘गुड न्यूज’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुलाखतीत कियाराने सांगितले होते की, तिला भेटण्यासाठी एका चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. अभिनेत्रीने सांगितले की मी मुंबईतील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहते. माझे घर सर्वात वरच्या मजल्यावर आहे.

एकदा अचानक कोणीतरी माझ्या घरात घुसले. एक माणूस माझ्या खोलीबाहेर उभा होता. तो मला भेटण्यासाठी लिफ्टमधून नाही तर इमारतीच्या सर्व पायऱ्या चढून वर आला होता. मी दार उघडले तेव्हा त्याला पाहताच मला खूप धक्काच बसला.

अभिनेत्रीने सांगितले, दारात उभा असलेला माझा चाहता पूर्णपणे घामाने भिजला होता, जेव्हा मी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने फक्त मला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. यासोबतच मी त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी तो आला होता.

कियारा पुढे म्हणाली की त्याचे माझ्यावरील प्रेम पाहून मला आनंद झाला, पण त्याच्या अशा कृतीने मी पुरतीच घाबरली. त्याला भेटल्यानंतर मी त्याला पुढे कधीही माझ्या घरी येऊ नकोस असेही सांगितले.

कियारा सध्या बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळेही सतत चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लग्न करू शकतात.