प्रियंका चोप्राने एका चाहत्याच्या कानाखाली आवाज...

प्रियंका चोप्राने एका चाहत्याच्या कानाखाली आवाज काढला होता……कारण काय होतं ? (When a Fan Publicly Caught Priyanka Chopra’s Hand, Then Actress Taught Him a Lesson Like This)

एखाद्या फिल्म स्टार्ससाठी त्यांचे काही चाहते इतके वेडे असतात की ते कोणत्याही थराला जातात. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी वेडेपिसे होतात. काही वेळेस ते सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या अगदी मागे पुढे करतात तर काहीजण कलाकारांच्या घरापर्यंत जातात. असेच एकदा अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या चाहत्यांच्या गराड्यात अडकली होती. तेव्हा एका चाहत्याने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रियंकाचा राग अनावर झाला होता.

एका मुलाखतीत प्रियंकाने या घटनेचा खुलासा केला होता. तिने सांगितले की, एका चाहत्याने भर रस्त्यात माझा हात पकडला आणि सेल्फी काढण्यासाठी हट्ट करु लागला. तेव्हा मला त्याचा भयंकर राग आला आणि मी थेट त्याची कॉलर पकडली आणि कानाखाली आवाज काढला.

२०१५ मध्ये जय गंगाजल या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी प्रियंकाने या घटनेचा खुलासा केला होता. ही घटना तिच्यासोबत २०१० मध्ये जेव्हा ती अंजना अंजानी चित्रपट करत होती त्यावेळी सेटवरुन बाहेर पडताना घडली होती.

प्रियंका पुढे म्हणाली की, मला त्याच्यासोबत फोटो काढण्यास काहीच अडचण नव्हती पण तो ज्याप्रकारे वागत होता ते मला मुळीच आवडले नाही. मी बाकी सगळं काही सहन करेन पण मला कोणी स्पर्श केलेला मला आवडत नाही. जेव्हा त्या चाहत्याने माझा हात पकडून मला सेल्फीसाठी विचारले तेव्हा मी खूप घाबरले होते. तेव्हा मी  त्याची कॉलर पकडली आणि त्याच्या कानाखाली आवाज काढून तिथून पळून गेली.

प्रियंका सर्वात शेवटी द स्काय इज पिंक या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने नेटफ्लिक्सच्या द व्हाइट टायगर या शो मध्ये काम केले. मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका लवकरच ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शितल होईल.

प्रियंकाने २०१८ मध्ये निक जोनाससोबत लग्न केले आणि तिने लॉस एंजेलिसमध्येच संसार थाटला. लग्नानंतर ती हॉलिवूड चित्रपटांमध्येच जास्त दिसली. मात्र तिचे चाहते तिच्या बॉलिवूड चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत.