गर्दीत गैरवर्तन करु पाहणाऱ्या मुलाला सुष्मिताने...

गर्दीत गैरवर्तन करु पाहणाऱ्या मुलाला सुष्मिताने असा शिकवला धडा (When a Boy Did a Dirty Act with Sushmita Sen in The Crowd, Actress Taught Such a Lesson)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही ग्लॅमर इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक मानली जाते. सुष्मिता ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असली तरी तिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. चाहत्यांमध्ये सुष्मिताची वेगळी क्रेझही आहे. मात्र, काहीवेळा चाहत्यांचा हा वेडेपणा कलाकारांच्या नाकीनऊ आणतो.  अशा अनुभवातून सुष्मितालाही सामोरे जावे लागले आहे.

असेच एकदा एका 15 वर्षाच्या मुलाने गर्दीत सुष्मिता सेनसोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनेत्रीने त्याच वेळी त्या मुलाला धडा शिकवला. सुष्मिताने एका मुलाखतीत सांगितले होते की, एका कार्यक्रमादरम्यान एका १५ वर्षाच्या मुलाने सार्वजनिक ठिकाणी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तो मुलगा तिच्या पोटावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला होता.

त्या मुलाचा वाईट हेतू लक्षात येताच सुष्मिताने लगेचच त्या मुलाची मान पकडली आणि त्याला म्हणाली की, तुझ्या या कृत्याबद्दल मी कोणाला सांगितले तर तुझे करीअर बरबाद होईल. यानंतर, मुलाने आपल्या कृत्याबद्दल अभिनेत्रीची माफी मागितली आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही असे वचन दिले.

सुष्मिताचे नाव अनेक अभिनेते आणि उद्योगपतींसोबत जोडले गेले असले तरी तिने अद्याप लग्न केलेले नाही. तसेच तिने दोन मुलींना दत्तक घेतले असून त्यांची आई म्हणून ती चांगली काळजी घेत आहे. अभिनयासोबतच सुष्मिता सेनला कविता लिहिण्याचीही आवड आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिला  कविता लिहायला आवडते.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनली होती. मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत, सुष्मिता सेनने आपल्या आईने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता, तो गाऊन एका स्थानिक टेलरने शिवला होता. सुष्मिता सेनच्या शिक्षणाविषयी सांगायचे तर, तिने हिंदी माध्यमात शिक्षण घेतले आहे. नंतर ती इंग्रजी शिकली आहे. इंग्रजीमध्ये पदवी घेतल्यानंतर अभिनेत्रीने पत्रकारिता केली.