अनन्या पांडे आणि आर्यनच्या व्हाट्सअप चॅटवरून धक...

अनन्या पांडे आणि आर्यनच्या व्हाट्सअप चॅटवरून धक्कादायक खुलासा, अभिनेत्रीने आर्यनकडे केली गांजासाठी मागणी… (WhatsApp chats between Ananya Panday and Aryan Khan revealed: Ananya Says, ‘Want To try Ganja’)

आर्यन खान ड्रग केसमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेच्या अडचणींत वाढ होत असलेली दिसत आहे. काल एनसीबीने अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत.

एनसीबीने आर्यन आणि अनन्या यांचे काही चॅट्स मिळवले आहेत. हाथी आलेल्या या चॅट्‌सवरून अनन्या संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. हे चॅट्‌स २०१८ ते २०१९ दरम्यान गांजासंदर्भात झालेले आहे. यापैकी एका चॅटमध्ये अनन्या आर्यनला सांगते की, तिने यापूर्वी गांजा घेतला आहे. आता तिला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. मात्र, एनसीबीने अनन्याला याबाबत विचारले असता तिने तिला नीट आठवत नसल्याचे कारण सांगितले आहे.

दुसऱ्या एका चॅट्समधून असं दिसत आहे की, आर्यन आणि अनन्या चॅटमध्ये गांजाविषयी बोलत होते. त्यावेळी आर्यन तिला गांजाची व्यवस्था करण्यास सांगत होता. त्यावर अनन्याने मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते असे म्हटले होते. आज एनसीबीने अनन्याला याबाबत प्रश्न विचारल्यावर तिने ‘मी तर मस्करी करत होते’ असे उत्तर दिले आहे.

असे सांगितले जात आहे की, जेव्हा एनसीबीने अनन्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा ती खूप गोंधळलेली दिसत होती आणि ‘आठवत नाही’ असे सांगून बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळत होती. ती म्हणाली की, आर्यनशी तिचे जे काही संभाषण झाले ते सिगारेटबद्दल होते. ते ड्रग्जबद्दल कधीही बोलले नाही. अनन्याला तिने ड्रग्ज घेतले आहे का, विचारताच तिने स्पष्टपणे नकार दिला. चौकशी दरम्यान अनन्या खूप चिंताग्रस्त होती आणि रडकुंडीला आली होती, असे सांगण्यात येत आहे.

आर्यन खानच्या फोनमध्ये अनन्या पांडेसोबतचं व्हॉट्सअॅप चॅट मिळाल्यानंतर अभिनेत्रीला एनसीबीकडून समन्स मिळाले. काल, अभिनेत्रीची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली आणि आज तिला पुन्हा एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागले. असे सांगितले जात आहे की आज अनन्याची चौकशी लांबवू शकते.

दरम्यान आयर्न खानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आर्यन खानला ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तेव्हा आर्यनला पुढील ९ दिवस तुरुंगात राहावे लागेल. मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानसह आठ जणांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम