तुमची पर्सनॅलिटी व्यक्त करते तुमची बॅग (What Yo...

तुमची पर्सनॅलिटी व्यक्त करते तुमची बॅग (What Your Handbag Says About Your Personality)

एक स्त्री सुंदर दिसण्यासाठी छान छान कपडे घालते, आकर्षक केशरचना करते, मेकअप करते. परंतु हातात स्टायलिश बॅग घेत नाही तोपर्यंत तिचा शृंगार पूर्ण होत नाही. प्रत्येक स्त्री आपापल्या आवडीप्रमाणे बॅगचा वापर करते. तिची ही बॅगची निवड तिची पर्सनॅलिटी व्यक्त करते. तुम्हीही जाणून घ्या तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ते?

होबो बॅग

होबो बॅग म्हणजे मोठी बॅग, ज्यात गरजेचं जवळजवळ सगळंच सामान राहतं. अशा प्रकारची मोठी बॅग वापरणाऱ्या स्त्रिया अतिशय व्यवहारी, मनस्वी असतात. यांना आयुष्यात सगळं परिपूर्ण लागतं.

स्लिंग बॅग

या शोल्डर स्ट्रीपच्या लहान बॅग्ज असतात. अशा बॅगची आवड असणाऱ्या स्त्रिया डोक्याने विचार न करता मनाने विचार करणाऱ्या असतात. घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्याला काय हवे हे त्यांना चांगलेच माहीत असते. या बॅगमध्ये जास्त सामान भरत नाहीत. काल्पनिक विश्वात रममाण होण्याचा यांचा स्वभाव असतो. तसेच नवनवीन कल्पनाही यांना सूचत असतात.

बाउलिंग बॅग

बाउलिंग बॅग वापरणारी स्त्री ही अतिशय स्ट्राँग असते. तिला कोणीही मुर्ख बनवू शकत नाही. ती कोणत्याही ट्रेंडचे अनुकरण न करता स्वतःची स्टाईल स्वतः बनवते. या मैत्रीपूर्ण व्यवहार करणाऱ्या असतात.

क्लच

क्लचची आवड असणाऱ्या स्त्रिया अतिशय क्लासी असतात. आपल्या आवडीच्या गोष्टी या स्त्रिया जिवापाड जपतात. लोकांना प्रभावित करणे यांना सहज जमते.

टॉट बॅग

या प्रकारची बॅग खास करून किशोरवयीन वा तरुण स्त्रियांच्या हातात दिसते. टॉट बॅग घेणारी तरुणी वा स्त्री ही प्रेमळ, मजेशीर, व्यवहारी आणि कामसू असते.

झीप्स आणि ज्वेल्स बॅग

झिपवाल्या वा ज्वेल्सच्या बॅगची आवड असणारी स्त्री जोखीम घेणारी असते. पुढचा मागचा विचार न करता काम करण्यास सुरुवात करते. ती परिणामांची पर्वा करत नाही. ही स्त्री प्रेमळ, मजेशीर असते. कोणाबद्दलचा राग मनात ठेवत नाही.

अंडर-द-शोल्डर बॅग

अशी बॅग वापरणाऱ्या स्त्रिया अतिशय सोफेस्टिकेटेड आणि क्लासी असतात. गर्दीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा आत्मविश्वास या स्त्रियांमध्ये दिसतो. बहुतेकदा या स्त्रिया ऑफिसर स्तरावरील असतात

ओवर साइज्ड बॅग

ओवर साइज्ड बॅग वापरणाऱ्या स्त्रिया या व्यवहारी आणि जमिनीवर पाय रोवून असतात. यांना आपल्याकडील कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसतो.

मॅसेंजर बॅग

ही बॅग वापरणाऱ्या स्त्रिया तणावापासून दूर राहतात आणि कोणतंही काम घाईघाईने करत नाही.

बॅकपॅक बॅग

अशी बॅग वापरणाऱ्या स्त्रिया अतिशय ॲक्टिव असतात. यांना फिरण्याची आवड असते. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आणि आरामशीर जीवन जगण्याची इच्छा बाळगणाऱ्या असतात.

अनयुजवल बॅग

अनयुजवल बॅग घेणारी स्त्री ही अतिशय हळवी असते. नात्यांना खूपच जास्त महत्त्व देते. सुरक्षित जीवन जगण्याची आवड असते.