शरीरसंबंध ठेवल्यावर विद्याला काय करायला आवडते: ...

शरीरसंबंध ठेवल्यावर विद्याला काय करायला आवडते: ऐका तिच्याच शब्दात (What Vidya Balan Prefers To Do After Sex?….Read Her Frank View)

सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन तिच्या घायाळ करणाऱ्या अदांसोबतच बिनधास्त वागण्यासाठीही प्रसिद्ध आहे.  विद्या बालन नेहमीच कोणत्याही विषयावर न घाबरता अगदी मनमोकळेपणाने आपले मत मांडते. एखादी गोष्ट बोलण्यास ती कधीच कचरत नाही. विद्याने अनेकदा तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तसेच तिच्या सेक्स लाइफबद्दल सुद्धा सांगितले आहे.

अभिनेत्री विद्या बालन ही इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती आता ४३ वर्षांची आहे. विद्याने इंडस्ट्रीत मेहनतीने स्वत:चे स्थान निर्माण केले. विद्या जेव्हा करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये गेली होती तेव्हा तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

कॉफी विथ करणच्या एका सीजनमध्ये विद्या अभिनेता फरहान अख्तरसोबत गेली होती. तेव्हा दोघांनी करणसोबत खूप गप्पा मारल्या. या शो मध्ये विद्याचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला. जेव्हा करणने विद्याला विचारले की तुला बेडरूममध्ये रात्री कोणती लाइट आवडते मंद की झगमगती ? यावर विद्याने तिला मंद प्रकाश खूप आवडत असल्याचे सांगितले. त्यानंतर करणने विचारले की बेडरूममध्ये जास्त काय आवडते मेणबत्ती की संगीत  ? यावर तिने दोन्ही असे उत्तर दिले.

यापुढे करणने तिला तिच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारला की संबंध ठेवल्यावर तुला यापैकी काय करायला आवडते ? त्यासाठीचे पर्याय होते चॉकलेट खायला, ग्रीन टी प्यायला की पुन्हा एखाद्या राउंडसाठी तयार व्हायला. यावर विद्याने दिलेल्या पर्यांयापैकी एकही न निवडता मला संबंध ठेवल्यानंतर पाणी प्यायला खूप आवडते कारण त्याची तहान भागवता भागवता मला स्वत:ला खूप तहान लागते असे उत्तर दिले.

काही दिवसांपूर्वी विद्या अभिनेत्री हुमा कुरैशीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. तेव्हा तिथे ती सैल कपडे घालून गेल्यामुळे गरोदर आहे अशा चर्चा सर्वत्र होत आहेत. विद्याचे पार्टीतील फोटो खूप व्हायरल होत आहेत. विद्याने २०१३ मध्ये निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले होते.