लॉकडाऊन स्ट्रेस घालविण्या करिता काय खाल? (What ...

लॉकडाऊन स्ट्रेस घालविण्या करिता काय खाल? (What To Eat, To Release Lockdown Stress)

लॉकडाऊन मध्ये राहा तणावमुक्त …
जगभर पसरलेल्या 39;कोरोना39; साथीने गेले दोन महिने आपल्या सगळ्यांनाच घरात बंदिस्त करून टाकले आहे. लॉकडाऊनच्या वाढत असलेल्या मुदतीमुळे नानाप्रकारचे विचार मनात येत आहेत. त्यामुळे लोकांना घरी बसण्याचा कंटाळा आला असून पुढे कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे, अशा प्रकारची चिंता वाटत आहे. या देशव्यापी लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनावर मोठा ताण आलेला आहे. ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. परंतु या परिस्थितीतही निरोगी व चिंतामुक्त राहण्यासाठी तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये खालील पदार्थांचा समावेश करा.
डार्क चॉकलेट
आपला बिघडलेला मूड पूर्ववत करण्यासाठी 39; चॉकलेट 39; हा उत्तम पर्याय आहे. चॉकलेट खाल्यामुळे शरिरात जे एडॉर्फिन्स बनतात त्यामुळे मनावरील ताण कमी होऊन आपणांला हलके वाटते. जेवणानंतर डार्क चॉकलेटचा एक तुकडा जरी खाल्ला तरी तो तात्काळ तुमचा मुड ठीक करतो.


केळं
केळं हे अतिशय गुणकारी फळ आहे. यातील पोटॅशियममुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. केळं खाल्यामुळे रक्तदाब सामान्य रहातो. केळ्यामध्ये नैसर्गिक शर्करा असते. त्यामुळे ऊर्जा वाढते. म्हणूनच आहार तज्ञ देखील न्याहरीमध्ये केळं खाण्याचा सल्ला देतात. त्यातून शरीराला आवश्यक असलेले ग्लूकोज मिळते.

दही
पोटांत जंतुसंसर्ग झाल्यासही आपल्याला ताण येतो हे संशोधनानी लक्षात आलेलं आहे. अशावेळी दही खावे. दह्यामधील प्रोबायोटिकस हे आपली पचनशक्ती सुधारून पोट मजबूत बनवते. ज्यामुळे आपल्या मेंदू ला चांगल्या भावनांचा सिग्नल मिळतो. असं हे कॅल्शियम आणि प्रथिन्यांनी भरलेलं दही खाल्ल्यास तणावाचं प्रमाणंही कमी होतं. लॉकडाऊनच्या दरम्यान मिळणार्‍या ह्या गोष्टी आहेत. तेव्हा पुढचा विचार करून आता आजार ओढवून घेण्यापेक्षा घरात सुरक्षित राहण्यासाठी हे
पदार्थ जरूर आहारात ठेवा.
लिंबूवर्गीय फळं/आंबटगोड फळं


सायट्रस फळांमध्ये संत्री, मोसंबी, लिंबू अशी आंबटगोड फळं अंतर्भूत होतात. यात 39; क39; जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट भरपुर प्रमाणात असतात. त्यामुळे तणाव कमी होतो. या फळांमध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे शाररिक थकवा दूर होतो. आणि चांगली झोप लागते. याशिवाय 39; क39; जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जखम झाली असल्यास ती लवकर भरून निघते.
पिस्ता


पिस्ता खायला सगळ्यांनाच आवडते. यामध्ये जस्त आणि मॅग्नेशियम असते. ते टेन्स झालेल्या नसांना शांत करते म्हणूनच काहीजण ऑफिसामध्येही पिस्ता नेऊन ठेवतात. जेव्हा निराशाजनक परिस्थिती येते त्या वेळेला पिस्ता खाल्याने बरं वाटते.